आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकंझावाला परिसरात एका तरुणीला कारने चिरडून १२ किलोमीटर फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने
३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, निर्भया प्रकरणाप्रमाणेच या तरुणीच्या क्रूर हत्येनंतर संतापाची लाट उसळली असून सोमवारी नागरिकांनी सुलतानपूर पोलिस ठाण्याबाहेर निदर्शन केली.
३१ डिसेंबर २०२२ च्या मध्यरात्री झालेल्या या घटनेने दोन दिवसानंतर उचल खाल्ली अाहे.
पोलिसांनी आधी केवळ अपघाताचा गुन्हा नोंदवला होता. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे कलमही लावण्यात आले.
दरम्यान, पाच आरोपीपैकी मनोज मित्तल हा भाजप नेता असून सुलतापूरी
येथे त्याचे रेशन दुकान आहे. अपघातावेळी दीपक खन्ना हा कार चालवत होता. त्याच्यासोबत मनोज, अमित खन्ना, कृष्ण आणि मिथुन होते असा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. सुलतानपूरी येथे संतप्त नागरिकांची निदर्शने सुरू
असताना पोलिसांशी झटापटही झाली यावेळी संतप्त जमावाने आपच्या आमदार राखी यांच्या गाडीची काच फोडली. दरम्यान, तरुणीचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मंडळामार्फत करण्यात आले.
परिसरातील ४०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबानुसार पोलिस सीसीटीव्ही फुटेजचे मॅपिंग करीत आहेत. आतापर्यंत ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रफिती पोलिसांनी तपासल्या आहेत. मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून आरोपी आणि पीडितेचा मार्ग या नकाशा तयार केला जात आहे. त्यावरुन अपघात व त्यानंतरची दुर्दैवी घटना कधी घडली याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.