आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In Delhi, Which Has A Population Of 2 Crore, Every Fourth Person Suffers From Corona Disease

कोरोना:2 कोटी लोकसंख्येच्या दिल्लीत प्रत्येक चौथ्या व्यक्तीला कोरोनाची बाधा, ते सर्व बरेही झाले!

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारच्या सीरो सर्व्हेमध्ये सर्वात मोठा गौप्यस्फोट

दिल्लीत दोन कोटी लोकांपैकी प्रत्येक चौथ्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आणि ते सर्व बरेही झाले आहेत. दिल्लीत २१,३८७ लोकांच्या सीरो सर्व्हेमध्ये २३.४८% लोकांत अँटिबॉडी सापडल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, ज्या लोकांत अँटिबॉडी सापडल्या त्यांच्यातील बहुतेकांत लक्षणेच नव्हती. तरी, अजूनही ७६% लोकांवर संसर्गाचा धोका कायम आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (एनसीडीसी) दिल्ली सरकारच्या मदतीने हा सर्व्हे केला. हा देशातील सर्वात मोठा सीरो सर्व्हे ठरला. दिल्लीत संसर्ग नेमका किती वाढला आहे हे तपासण्यासाठी २७ जून ते १० जुलैदरम्यान कोविड कवच एलिसाचा वापर करून अँटिबॉडी तपासण्यात आल्या होत्या.