आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Favor Of Patidars OBCs, BJP Cuts Tickets Of 38 Sitting MLAs Including Five Ministers

विधानसभेसाठी पहिली यादी जाहीर:पाटीदार-ओबीसींना झुकते माप, भाजपने पाच मंत्र्यांसह 38 विद्यमान आमदारांची कापली तिकिटे

गुजरात5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीला तिकीट - Divya Marathi
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीला तिकीट

४४ उमेदवार ओबीसी, ४० पाटीदार; २९ वर्षीय हार्दिक पटेल सर्वात तरुण

अहमदाबाद/नवी दिल्ली गुजरात निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी सकाळी पहिली यादी जाहीर केली. यात १८२ जागांपैकी १६० जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. गुजरातची सत्ता गेल्या २७ वर्षांपासून ताब्यात ठेवणाऱ्या भाजपने नव्या चेहऱ्यांचे नशीब अजमावण्याचे सूत्र या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवले आहे. १९९५ नंतर प्रथमच तिरंगी लढतीच्या शक्यतेत ३८ आमदारांची तिकिटे कापली आहेत. यामध्ये ५ मंत्रीही आहेत. यादीत ७५ चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यात ६९ विद्यमान आमदार आहेत. ३८ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, नितीन पटेलसह सहा बड्या नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. सूत्रांनूसार, कामगिरीच्या तक्त्यात ८०% पेक्षा कमी गुण घेणाऱ्या २५% आमदारांची तिकिटे कापली आहेत. दिल्लीत बुधवारी सायंकाळी ३ तास चाललेल्या बैठकीत जातीय समीकरणावर चर्चा झाली. यात अखेर प्रजापती, कोळी, ठाकोर, जैन, क्षत्रिय, अहीर, ब्राह्मण, बंजारा, माळी, भोई, वाघेर, राणासारख्या सर्व समाजांत संतुलन राखवण्यावर सहमती झाली. यादीत ४९ उमेदवार ओबीसी, ४० पाटीदार, २४ एसटी, १९ क्षत्रिय, १३ एससी, १३ ब्राह्मण आणि २ जैन समाजाचे आहेत.

काँग्रेसमधून आलेल्या २० जणांना तिकिटे, एक तृतीयांश उमेदवार बदलण्याचा निर्णय 2007 मध्ये १८ चे तिकीट कापले. पक्षाने १२७ जागा जिंकल्या होत्या. 2012 मध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त तिकिटे कापली, ११६ जागांसह पुनरागमन. 2017 मध्ये ३०% आमदार बदलले, ९९ जागांसह सत्तेत परतले.

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीला तिकीट
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडियातून लढतील. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या अमीबेन यागनिक आहेत. १४ महिलांना तिकीट दिले. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाला उ. जामनगरमधून उमेदवारी दिल्याने सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे.

36% बारावीपर्यंत डॉक्टर :5 पीएचडी :4 पदवी :34 पोस्ट ग्रॅज्युएट :13 डिप्लोमा :10 एलएलबी :13 इंजिनिअर :8 12 वी :20 10 वी :27 11 वी :1 9 वी :5 8 वी :2 चौथी :1

मोरबी दुर्घटनेत जीव वाचवणाऱ्या कांतीलालना संधी : मोरबी पूल दुर्घटनेत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी नदीत उडी टाकणारे कांतीलाल अमृतिया यांना मोरबीतून तिकीट मिळाले आहे. ते आमदार होते. विद्यमान आमदार, मंत्री ब्रिजेश मेरजा यांच्या जागी त्यांना संधी दिली आहे.

हार्दिक पटेलला तिकीट, मुस्लिम उमेदवार नाही :

५ वर्षांत काँग्रेस सोडून भाजपत आलेल्या २० आमदारांना तिकीट मिळाले. २९ वर्षीय हार्दिक सर्वात तरुण उमेदवार आहे. १८२ पैकी ३० जागी मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. लोकसंख्येत समाजाचे १०% मतदार आहेत. मात्र,भाजपने २४ वर्षांत मुस्लिम उमेदवार दिला नाही.

बातम्या आणखी आहेत...