आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका:पाच वर्षांमध्ये 1.29 कोटी मतदारांनी नोटाला निवडले

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पाच वर्षांत सुमारे १.२९ कोटी मतदारांनी नोटाला निवडले आहे. गुरुवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या एनजीओच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली. २०१८ ते २०२२ या काळात झालेल्या विविध विधानसभा व सार्वजनिक निवडणुकांत देण्यात आलेल्या नोटा मतांच्या विश्लेषणाच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे.

त्यानुसार, २०२० मध्ये झालेल्या बिहार व दिल्ली विधानसभा निवडणुकीत नोटाचा १.४६ टक्के (७,४९,२५२) वापर झाला. बिहारमध्ये ७,०६,२५२ नोटा मते देण्यात आली. तर दिल्लीत फक्त ४३,१०८ आहेत. २०२२ मध्ये झालेल्या ५ विधानसभा निवडणुकीत फक्त ०.७० टक्के (८,१५,४३०) नोटाचा वापर करण्यात आला. पैकी गोव्यात १०,६२९, मणिपूर १०,३४९, पंजाबमध्ये १,१०,३०८, उत्तर प्रदेशात ६,३७,३०४ व उत्तराखंडमध्ये ४६,८४० नोटा मते पडली.

बातम्या आणखी आहेत...