आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In Front Of The Lunch Box ... But The Workers Insisted; No More Eating Without Producing Another 50 Tons Of Oxygen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भेटा या ‘प्राणवायू’ योद्ध्यांना:भोजनाचा डबा समोर... तरी मजुरांची जिद्द अशी; आणखी 50 टन ऑक्सिजन तयार केल्याशिवाय जेवायचेच नाही

बोकारो / राजेशसिंह देव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेल बोकारो : 25 अधिकारी व 1455 मजूर देशाला रोज 150 टन ऑक्सिजन मिळावा म्हणून अहोरात्र काम करतात
दुपारचे ३ वाजलेत. आम्ही आहोत स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (सेल) आयनॉक्स बोकारो प्लँटमध्ये. येथे दिवसरात्र द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन तयार होतो आहे. मशीनची धडधड सुरू आहे. येथून ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी उत्तर प्रदेशातून एक रॅक बाहेर पडला आहे. शनिवारी रात्री १० वाजता तो बोकारोला पोहोचेल. या प्लँटमध्ये बीएसएलचे ९० कर्मचारी आहेत. मेसर्स आयनॉक्सच्या प्लँटमध्ये सुमारे ८० कर्मचारी. येथे ८-८ तासांच्या शिफ्टमध्ये दिवसरात्र ऑक्सिजन निर्मिती सुरू आहे. मजुरांच्या समोर भोजनाचा डबा पाहून आम्ही विचारले, जेवण झाले? तर मजूर म्हणाले- रोज १५० टन ऑक्सिजन निर्मिती करावयाची आहे. जोवर आणखी ५० टन निर्मिती होत नाही तोवर आम्ही भोजन करणार नाही.

देशाला ऑक्सिजन पुरवण्याची जिद्द : या स्टिल प्लँटचे प्रभारी संचालक अमरेंदू प्रकाश म्हणतात, हा आव्हानांचा काळ आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढत गेली. त्यामुळे याचा अनेक शहरांत तुटवडा निर्माण झाला. या स्थितीत सेलच्या या कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीचे आव्हान स्वीकारले. येथून महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत ऑक्सिजन पुरवला जात आहे.

दोन्ही प्लँटची क्षमता रोज २०५० टन : बोकारो स्टिल प्लँटमध्ये ऑक्सिजनचे दोन प्लँट आहेत. याची रोज निर्मितीची क्षमता ८०० टन इतकी आहे. तर, मेसर्स आयनॉक्सच्या प्लँटची वायुरुपातील ऑक्सिजन निर्मितीची क्षमता रोज १२५० टन आहे.

देशात रोज १५० मे. टन वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा : कोविड-१९ रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजनची गरज पाहता दोन्ही प्लँटमधून द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यात आले आहे. दोन्ही प्लँटमधून सध्या १५० मे. टन द्रवरुप ऑक्सिजन तयार केला जात आहे. एप्रिलच्या प्रारंभी ही क्षमता १०० मे. टन होती. याची क्षमता आणखी ५० मे. टनने वाढवण्यासाठी आता वायुरुपातील ऑक्सिजन निर्मिती कमी करून द्रवरुप ऑक्सिजनवर भर देण्यात आला आहे. ऑगस्ट २०२० ते मार्च २०२१ पर्यंत बोकारो स्टिल प्लँटने ६१०० मे. टनाहून अधिक द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवला होता.

भिलाई स्टील प्लँट : प्रथमच पूर्ण क्षमतेने काम, वितरणासाठी केंद्राचे २, तर राज्याचे ४ अधिकारी २४ तास असतात हजर
उमेश निवल | भिलाई

राज्यात सध्या २९ प्लँटमधून ४०० टनाहून अधिक वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. प्रथमच पूर्ण क्षमतेने येथे उत्पादन केले जात आहे. अधिकाऱ्यांनुसार, मागणी पाहता द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा एक आव्हानात्मक काम आहे. दुसऱ्या राज्यात वेळेवर ऑक्सिजन पोहोचावा म्हणून प्रथमच ग्रीन कॉरिडॉरसारखी पद्धत अवलंबली जात आहे. औद्योगिक ऑक्सिजनची निर्मिती मार्चनंतर बंदच करण्यात आली आहे. बीएसपीमध्ये ऑक्सिजनचे दोन प्लँट आहेत. प्रॅक्स एअर याचे काम पाहते. प्लँट-१मधून उत्पादन बंद झाले आहे. प्लँट २ व ३ ची उत्पादन क्षमता रोज २६५ टन आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनी यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. बीएसपीच्या ऑक्सिजन प्लँटमध्येच राज्य शासनाचे ४ आणि केंद्राचे दोन अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. ज्या राज्यांशी पुरवठ्याबाबत करार झाला आहे त्या हिशेबाने ऑक्सिजन पुरवठा करण्याचे या अधिकाऱ्यांना निर्देश आहेत. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सध्या रोज राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेदांची स्थिती आहे. त्यामुळे बीएसपीच्या व्यवस्थापनानेही याबाबत माध्यमांशी बोलण्यास आपल्या अधिकाऱ्यांना मनाई केली आहे.

देशात प्रथमच ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तयार केला जातोय ग्रीन कॉरिडॉर
प्लँटपासून राज्याच्या सीमेपर्यंत वाहतुकीदरम्यान बाधा येऊ नये म्हणून परिवहन विभागानेही ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे काम हाती घेतले. प्लँटमधून टँकर सहजपणे बाहेर पडावेत म्हणून बीएसपी व्यवस्थापनाने मरोदा गेटसह मुख्य गेटही उघडले आहे.

देशात ९ राज्यांमध्ये होतोय पुरवठा
बीएसपीच्या दोन्ही प्लँटमधून ९ राज्यांत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात, कर्नाटक आणि छत्तीसगडचा समावेश आहे.

एप्रिलमध्ये कुणाला किती ऑक्सिजन दिला
झारखंड 308
उत्तर प्रदेश 456
बिहार 374
प. बंगाल 19
पंजाब 44
महाराष्ट्र 19
मध्य प्रदेश 16
आकडे मेट्रिक टनमध्ये

बातम्या आणखी आहेत...