आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Galwan, 42 Chinese Soldiers, Not 4, Were Killed; We Do Not Respect Our Own Martyred | Marathi News

ड्रॅगनने लपवली वस्तुस्थिती:गलवानमध्ये चीनचे 4 नव्हे, 42 जवान मारले गेले होते; आपल्याच शहीद जवानांचा सन्मान नाही

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले कृत्य दडवण्यात बदनाम असलेल्या चीनने गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या आपल्या जवानांची संख्याही लपवली होती. ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र “द क्लॅक्सन’ने केलेल्या दाव्यानुसार, लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे ४२ जवान मारले गेले होते. चीनने मात्र ४ जवानांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले होते.

“गलवान डिकोडेड’ या वृत्तात १५ आणि १६ जून २०२० रोजी झालेल्या संघर्षाबाबत खुलासा केला आहे. या चकमकीत दोन्ही देशांत सीमापार ४ दशकांतील सर्वात गंभीर संघर्ष होता. वृत्तपत्राने चीनच्या मायक्रोब्लॉगिंग नेटवर्क व्हीबोच्या युजर्सच्या पोस्टवरील संशोधनाच्या आधारावर खुलासा केला आहे. त्यात नमूद केले की, घटनेच्या रात्री एक ज्युनियर सार्जंटसह कमीत कमी ४२ चिनी सैनिक गलवान नदीत वाहून गेले. चीनने एक ज्युनियर सार्जंट बुडाल्याचे कबूल केले होते. भारताने २० जवान शहीद झाल्याची माहिती दिली होती. चीनने या घटनेच्या ८ महिन्यांनंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये गलवानमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ४ जवानांना पदक देण्याची घोषणा केली होती.

द क्लॅक्सनच्या सोशल मीडिया रिसर्चर्स ग्रुपनुसार, चीनला अनेक पट जास्त नुकसान झाले. चीनने या संदर्भात चर्चा बंद करण्यासाठी मारलेल्या सैनिकांची खरी संख्या लपवली. चिनी सरकारने सोशल मीडियावरून या संदर्भात पोस्ट आणि ब्लॉगही हटवला आहे.

वस्तुस्थितीवर परिणाम करण्यासाठी गलवानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींची छायाचित्रे जोडली आहेत. मात्र, त्यांच्या डिजिटल आर्काइव्हमुळे खोट्याचा पर्दाफाश झाला आहे. वृत्तपत्रानुसार, ही हिंसक चकमक एका तात्पुरत्या पुलावरून झाली होती. चीन आपल्या भागात अवैध बांधकाम करत होता आणि गस्त वाढवत होता. त्याच्या निगराणीसाठी भारतीय सैनिकांनी २२ मे २०२० रोजी नदीकिनाऱ्यावर तात्पुरता पूल बांधला. ६ जून रोजी चिनी सैनिकांनी हा पूल तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने त्यांचा मनसुबा उधळला. यादरम्यान भारत आणि चीनचे लष्करी अधिकारी तणाव कमी करण्यासाठी बफर झोनवर सहमत झाले. मात्र, चीनने आपल्या भागावर तात्पुरते बांधकाम काढण्याऐवजी भारतीय पूल तोडला. यादरम्यान येथे संघर्ष उडाला. त्यात आणखी दोन जवानांचा मृत्यू झाला.

गलवानमधील चिनी सैनिक क्रीडा ज्योत वाहक : भारताचा बहिष्कार
नवी दिल्ली | गलवान चकमकीतील जखमी सैनिकास हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत क्रीडा ज्योत वाहक करण्याच्या चीनच्या निर्णयाला भारताने तीव्र विरोध केला आहे. भारताने सांगितले की, बीजिंगमध्ये त्यांचे वरिष्ठ अधिकारी विंटर ऑलिम्पिकच्या उद‌्‌घाटन आणि समारोप समारंभात सहभागी होणार नाहीत. भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, ही दु:खद बाब आहे की चीन खेळांचे राजकारण करत आहे. अमेरिकेनेही या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...