आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Gujarat 10 storey Five star Hotel With 318 Restaurants At The Railway Station!

अहमदाबाद:गुजरातमध्ये देशात पहिल्यांदाच रेल्वेस्थानकावर 318 खाेल्यांचे 10 मजली पंचतारांकित हाॅटेल!

अहमदाबाद / ओंकारसिंह ठाकूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गांधीनगर रेल्वेस्थानकाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वेस्थानक तयार केले जात आहे. देशात पहिल्यांदा स्थानकाच्या वरील भागात पंचतारांकित हाॅटेलही बांधण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते शुक्रवारी त्याचे उद्घाटन हाेणार आहे. गांधीनगर रेल्वे अँड अर्बन डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन लिमिटेड व इंडियन रेल्वेेचा हा संयुक्त उपक्रम आहे. त्यात भागीदारी ७४ टक्के आहे. स्थानकावर अडीच मीटरच्या ५० स्तंभांवर हे हाॅटेल बांधले आहे. त्यात ३१८ खाेल्या आहेत. या प्रकल्पावर ७९३ काेटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यापैकी ९३ काेटी रेल्वेस्थानकावर खर्च झाले आहेत. स्थानकावर तीन प्लॅटफाॅर्म, दाेन सरकते जिणे, तीन एलिव्हेटर, दाेन पेडेस्ट्रियन सब-वेचे निर्माण केले आहे. हाॅटेल रेल्वेस्थानकापासून २२ मीटर उंचीवर आहे.

हाॅटेलला जाण्यासाठी अंडरपास तयार करण्यात आले आहेत. महात्मा मंदिराच्या समाेरील हाॅटेलमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरीय उद्याेजक बैठकीसाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यात विक्रेते-खरेदीदार यांच्यासाठी व्यवस्था असेल. दिव्यांगांसाठी रेल्वेस्थानकावर वेगळा मार्ग तयार करण्यात आला आहे. स्थानकाच्या डाव्या बाजूला वातानुकूलित सामाजिक हाॅल उपलब्ध असेल. तेथे सामाजिक समारंभांसाठी हा हाॅल उपलब्ध असेल.