आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Gujarat, Journalist Isudan Gadhvi Is AAP's Chief Ministerial Candidate, Son Of A Farmer turned journalist

राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा:गुजरातेत पत्रकार इसुदान गढवी ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, शेतकरी कुटुंबातील मुलगा ते पत्रकार

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले व नंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात तसेच दूरचित्रवाणीवर अँकर म्हणून प्रसिद्धीस आलेले इसुदान गढवी गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे (आप) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. गेल्या वर्षी जून महिन्यात गढवी यांनी आपमध्ये प्रवेश केला तेव्हा राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा झाली होती. त्याच गढवी यांना अरविंद केजरीवाल यांनी आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. आपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार हा जनतेतून निवडलेला असेल, असे केजरीवाल म्हणाले होते. त्यानुसार, टीव्ही अँकर म्हणून प्रसिद्ध असलेले गढवी यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी जनतेतून मते आजमावण्यात आली होती. यात १६ लाख लोकांनी मते मांडली होती, असा केजरीवाल यांचा दावा आहे.

बातम्या आणखी आहेत...