आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकटाचा धक्कादायक परिणाम:गुजरातमध्ये ‘मृत्यू’च्या श्रेणीत कमी झाले दीड लाख मतदार

जुनागड / निमिष ठाकूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा-२०२२ साठी जाहीर मतदारयादीतून केवळ मृत्यू झाल्यामुळे १ लाख ५० हजार ९६२ नावे वगळावी लागली आहेत. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदारयादीचे तुलनात्मक विश्लेषण केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. २०१९ नंतर “मृत्यू’ श्रेणीतून १.५० लाखांहून जास्त मतदारांची नावे यादीतून वगळावी लागली आहेत. याच काळात कोरोनाचे संकट होते. मग कोरोनामुळे मृतांची ही संख्या असामान्य होती का, असा प्रश्न निर्माण होतो. राज्यांनी जाहीर केलेल्या कोरोनाचे आकडे संकलित करणारे पोर्टल covid19bharat वर गुजरातमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ हजार ४० दाखवण्यात आली आहे.

जुनागड जिल्ह्यातही हा आकडा तिप्पट : जुनागड जिल्ह्यातील एकूण पाच विधानसभा मतदारसंघांत मृत्यू श्रेणीत ४ हजार ६९ नावे वगळावी लागली आहेत. जानेवारी-२०१९ मध्ये ही संख्या १ हजार २३१ होती. म्हणजेच विधानसभा निवडणुकीमुळे मतदारांची नावे तिपटीने अधिक वगळण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे मतदार यादीत १८ वर्षांहून कमी वयाच्या कोरोना पीडितांचा समावेश नाही. कारण १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मतदार यादीत समावेश होतो. सामान्यपणे विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या वेळी नवीन मतदार यादी तयार होते. त्याच प्रक्रियेत निवडणूक आयोग नवीन मतदार व वगळण्यात येणाऱ्या नावांचे विश्लेषण करत असते. पत्ता, नावात बदल, बेपत्ता, अपात्र इत्यादी कारणावरून ती वगळली जातात. मात्र, विधानसभा-२०२२ च्या मतदार यादीतील सर्वाधिक नावे ‘मृत्यू’ श्रेणीत कमी झाली आहेत.

अहमदाबादमध्ये सर्वात जास्त नावे कमी झाली गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक मतदार वगळण्याचा प्रकार अहमदाबाद जिल्ह्यात (९ हजार ५४७) झाल्याचे दिसून येते. महिसागर यादीतून सर्वात कमी (१,७३६) मतदार कमी झाले आहेत. २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार यादीत अनेक पटीने नावे ‘मृत्यू’ च्या कारणाने कमी झाल्याची नोंद आहे. संपूर्ण गुजरातमध्ये ही संख्या १,५०,९६२ आहे.

बातम्या आणखी आहेत...