आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In Gujarat's Valsad Civil Hospital Heaps Of Corpses, Foul Smelling Due To Lack Of Dead Body In Three Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंत्यविधीसाठीही रांगा?:गुजरातच्या सरकारी रुग्णालयांमध्ये मृतदेहांचा ढीग; 3 दिवसांपासून अंत्यविधी न झाल्याने पसरतोय दुर्गंध

वलसाड(गुजरात)19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन दिवसांपासून मृतदेह तसेच पडून असल्यामुळे त्यांच्यातून वास येत आहे

गुजरात राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. राज्यातील परिस्थितीचा अंदाज वलसाडच्या जिल्हा सिव्हिल हॉस्पीटलमधील घटनेवरुन लावला जाऊ शकतो. या हॉस्पीटलच्या कोरोना वार्डातून एका पाठोपाठ एक मृतदेह येतच आहेत. पोस्टमॉर्टम रुममध्येही मृतदेह तसेच पडून आहेत. जिल्ह्यात अचानक वाढलेल्या मृत्यूंमुळे डेथ सर्टिफिकेट तयार करायलाही तासनतास लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की,अनेक मृतदेहांवर मागील तीन दिवसांपासून अंत्यविधी करण्यात आलेला नाही. त्यांना तसेच ठेवल्यामुळे त्यांच्यातून आता वास येऊ लागला आहे.

सिव्हिल हॉस्पीटलचे सुपरिटेंडेंट अमित शह यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांसाठी या ठिकाणी 400 बेडची सुविधा आहे. पण, अनेक जण परिस्थी गंभीर झाल्यानंतर हॉस्पीटलमध्ये भरती होत आहेत. अशावेळी त्यांना ऑक्सीजन किंवा व्हेटिलेटरची गरज भासत आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे आमचे कामही वाढले आहे. कोव्हिड वार्डातून पोस्ट मॉर्टम रुमपर्यंत मृतदेहांना नेण्यासाठी बाहेरून लोक बोलवावे लागत आहेत.

अंत्यदर्शनसाठी 36 तासांची प्रतिक्षा

वलसाड सिव्हिल हॉस्पीटलबाहेर मृतांचे नातेवाईक अनेक तासांपासून मृतदेहाची वाट पाहत आहेत. यातील काहीजण 36 तासांपासून अंत्यदर्शनाची आस लावून बसले आहेत. हॉस्पीटलच्या गलथान कारभारामुळे लोकांमध्येही नाराजी वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...