आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंदीगड:हरियाणात 50 हजारांपर्यंत पगाराच्या खासगी नोकऱ्यांत भूमिपुत्रांना 75% आरक्षण जाहीर

चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्थिक मागासांना पोलिस भरती वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट

हरियाणातील खासगी कंपन्या-उद्योगांत ५० हजार रुपयांपर्यंत पगाराच्या नोकऱ्यांत स्थानिक लोकांना ७५% आरक्षण मिळणार आहे. तशी तरतूद असलेले विधेयक राज्य विधानसभेने गुरुवारी मंजूर केले. त्यानुसार ७५% स्थानीय तरुणांना नोकरी देण्याचा नियम कंपन्या, सोसायटी, ट्रस्ट, फर्म आदींवर लागू असेल. तेथे किमान १० कर्मचारी असावेत. एखाद्या जिल्ह्यातील कमाल १०% लोकांना नोकरी देता येईल. नियमाचे उल्लंघन केल्यास १० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. हे आरक्षण सध्या १० वर्षांसाठी लागू झाले आहे. आता ते अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येईल.

आर्थिक मागासांना पोलिस भरती वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना पोलिस भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली आहे. म्हणजे या घटकांतील तरुण आता वयाच्या २५ ऐवजी ३० व्या वर्षापर्यंत हरियाणा पोलिसांच्या भरतीत सहभागी होऊ शकतील.