आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना विषाणू संकटाने संपूर्ण जगासोबत भारताच्या अर्थव्यव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम केला आहे. विविध कारखाने बंद होणे आणि लॉकडाऊनमुळे वाहनांच्या वापरात बरीच घट आल्यामुळे देशात पेट्रोलियम उत्पादनाच्या मागणीत खूप घट झाली. असे असले तरी, अनलॉकचा टप्पा सुरू झाल्यानंतर मागणीत सुधारणा नोंदवली जात आहे आणि ही कोरोनापूर्व काळाच्या स्तरापेक्षा खूप जवळ पोहोचली आहे. भारत जगातील सर्वात वेगात वाढणारी इंधनाची बाजारपेठ आहे. जून-२०२० मध्ये भारतामध्ये इंधनाची मागणी जून २०१९ च्या ८८% स्तरापर्यंत पोहोचली आहे. एप्रिलमध्ये भारतात इंधनाची मागणी वर्षाआधीच्या तुलनेत निम्मी राहिली होती. जूनचे आकडे अशा वेळी आले आहेत जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा हळूहळू रुळावर येत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणि आर्थिक हालचाली पुन्हा सुरू होणे हे याचे सर्वात मोठे कारण आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील तीन सर्वात माेठ्या कंपन्यांपैकी एक इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या विक्रीची आकडेवारी तयार केली जात आहे. या तीन कंपन्या भारतीय पेट्रोलियम बाजाराच्या ९० टक्के हिश्शावर नियंत्रण ठेवतात. आकडेवारीनुसार, जूनमध्ये डिझेलची विक्री ५५ लाख टन राहिली. ही मेच्या तुलनेत २०% जास्त आहे. असे असले तरी, ही जून-२०१९ च्या तुलनेत १७ टक्के कमीही आहे. डिझेल भारतात सर्वात जास्त वापर होणारे इंधन आहे. पेट्रोलची विक्रीही मेच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. मात्र, ही जून-२०१९ च्या तुलनेत १५ टक्के कमी राहिली. जेट इंधनाचा वापर जून २०१९ च्या तुलनेत आताही ६७ टक्के कमी राहिला. देशाच्या या तीन मोठ्या तेल कंपन्यांच्या शुद्धीकरण प्रकल्पात सध्या क्रूड व्हॉल्यूम ८५% पातळीवर आहे. एप्रिलमध्ये हा ५५ टक्क्यांपर्यंत घसरला होता. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, सप्टेंबरच्या अखेरपर्यंत भारतात पेट्रोलियम मागणी सामान्य राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.