आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In June The Narmada River Crossed The Danger Level, Raising The Water Level By 1.2 Meters

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेश:जूनमध्येच नर्मदेने धोक्याची पातळी ओलांडली, पाणी पातळीत १.२ मीटर वाढ

मध्य प्रदेश9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्य प्रदेशातील बडवानी राजघाट येथील मंदिरेही पाण्याखाली

बडवानी निसर्ग वादळामुळे देशात काही दिवसांपासून पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे जून महिन्यातच नर्मदा नदीत धोक्याच्या पातळीवरून पाणी वाहते आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात नर्मदेची पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर पोहचली होती. निसर्ग वादळाने मध्य प्रदेशात झालेल्या पावसाने नर्मदेत आताच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नर्मदेचे पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा १.२ मीटरने पाणी वाहते आहे. शनिवारी नर्मदेची पाणी पातळी १२४.४० मीटर होती. राजघाटात धोक्याची पातळी १२३.२८० मीटर आहे, तर पाऊस पडण्यापूर्वी पाणी पातळी ११८.०० मीटरच्या जवळपास होती.

वीज तयार करून सोडले जातेय पाणी : 

मध्य प्रदेशातील एनव्हीडीए अधिकारी एस. एस. चौंगड यांनी सांगितले, सरदार सरोवर धरणाची पाणी पातळी १२४.६१ मीटर इतकी आहे. धरणाचे दरवाजे बंद आहेत. कालव्यातून वीजनिर्मिती करून पाणी सोडले जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने उपनद्यांत पाणी आल्याने नर्मदेत पाणी पातळी वाढली.  

बातम्या आणखी आहेत...