आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Karnataka, A Sikh Girl Has Now Been Asked To Take Off Her Turban | Marathi News

बंगळुरू:कर्नाटकात आता शीख मुलीला पगडी उतरवण्यास सांगितले, सरकारने सीएफआयबाबत उच्च न्यायालयात दाखल केला अहवाल

बंगळुरू6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक हिजाब वादावर उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूच्या एका महाविद्यालयात शीख मुलीला पगडी उतरवण्यास सांगण्यात आले. न्यायालयाने हिजाब प्रकरणात अादेशात शाळा-महाविद्यालयात अधिकृत गणवेश परिधान करण्यास सांगितले आहे. अलीकडेच शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी महाविद्यालयाचा दाैरा केला. यादरम्यान हिजाबमध्ये आलेल्या विद्यार्थिनींनी त्यांची भेट घेतली. हायकाेर्टाच्या आदेशानुसार हिजाब किंवा काेणतेही धार्मिक प्रतीक परिधान करून प्रवेश करता येणार नाही, असे त्यांना स्पष्ट करण्यात आले. त्यावर या विद्यार्थिनींनी शीख विद्यार्थिनी धार्मिक प्रतीक धारण करून येत असल्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर महाविद्यालयाने शीख परिवाराशी संपर्क साधून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. मुलीच्या कुटुंबाने मात्र मुलगी पगडी काढणार नसल्याची भूमिका घेतली. आम्ही कायदेशीर मत जाणून घेत आहाेत. हायकाेर्ट व सरकारच्या आदेशात शीख पगडीचा उल्लेख नसल्याचे या परिवाराचे म्हणणे आहे. उडुपीमध्ये हिजाब परिधान करून येणाऱ्या विद्यार्थिनींना काॅलेजातून बाहेर करण्यावरून वादंग झाले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हायकाेर्टाच्या आदेशाचे पालन करावे, अशी सूचना केली आहे. पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनींनी एक तक्रार केली आहे. आम्हाला परीक्षेस बसू दिले नसल्याने पेपर सुटल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सीएफआयविरुद्ध कारवाई :
कॅम्पस फ्रंट आॅफ इंडियाच्या (सीएफआय) सदस्यांविराेधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती कर्नाटक सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. उडुपीच्या सरकारी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स काॅलेजच्या काही शिक्षकांना धमकावण्याचा आराेप सीएफआयवर आहे. हायकाेर्टाची कार्यवाही सुरू झाल्यावर राज्याचे महाधिवक्ता प्रभुलिंग नवदगीने हायकाेर्टाच्या पूर्ण पीठाला सीलबंद लिफाफ्यात सीएफआयशी संबंधित अहवाल दिला. हिजाब प्रकरणात मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, न्यायमूर्ती जे.एम. खाजी व कृष्णा एस. दीक्षित यांच्या पूर्ण पीठाकडे हिजाब प्रकरणात सुनावणी सुरू आहे. आॅल इंडिया बार असाेसिएशनने या प्रकरणात मुस्लिम पर्सनल लाॅ बाॅर्डाच्या प्रतिनिधीस सामील करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...