आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकमध्ये सत्तारुढ भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांतील बहुतांश जणांना उमेदवार देणार आहे. पक्षाचे हे धोरण बहुतांश आमदारांचे तिकीट कापण्याच्या फॉर्म्युल्याविरुद्ध आहे.
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने या बाबतचे संकेत बंगळुरूतील आमदारांच्या एका बैठकीत दिले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्याच्या पक्ष संघटनेला जो फिडबॅक मिळाला आहे, त्या दृष्टीने संघटनेत बऱ्याच विरोधाभास आहे. माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा भले निवडणूक लढणार नसले तरी संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच आहे. विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि प्रदेशाध्यक्ष नलिन कतील यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. ही पक्षातील मोठी समस्या आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानुसार, २०१८, २०१३, २००७ मध्ये तिकीट कापल्यावर आमदारांनी पक्ष सोडला होता. अशात काही आमदार वगळता सर्वांना तिकिटे मिळतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.