आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Karoi Village Of Rajasthan, Everyone From Young To Old Is An Astrologer, Latest News And Update

ABCD शिकण्याच्या वयात मुलांची राहू-केतूवर नजर:छोट्याशा गावात भविष्य जाणून घेण्यासाठी अमेरिका-फ्रान्सहून येत आहेत लोक

जयपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या भीलवाड्यातील कारोई गाव अनेक कारणांनी अनोखे आहे. सामान्यतः कोणत्याही मुलाचे फॉर्मल शिक्षण A,B,C,D किंवा क, ख, ग ने होते. पण, या गावातील मुलांना सूर्य, चंद्र व ग्रहांची चाल कळते. ही मुले गणिताचा वापर 2+2=4 साठी नव्हे तर भविष्य सांगण्यासाठी करतात. या मुलांना बालपणापासूनच शालेय शिक्षणासह ज्योतिष विद्या शिकवली जाते.

येथील घराघरात ज्योतिषी आहे. यामुळे कारोईला ज्योतिषांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. येथे राजकारण्यांपासून मोठ-मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वजण आपला भविष्यकाळ जाणून घेण्यासाठी येतात. पंडित योगेश शास्त्रांनी सांगितले की, राज्यातील एका बड्या नेत्याने नुकतेच राज्यसभा निवडणुकीचा अंदाज घेण्यासाठी आपल्या एका कार्यकर्त्याला पाठवले होते. याशिवाय विरोधी पक्षांचे अनेक नेतेही यासंबंधी येथे आले होते.

भविष्य सांगण्याचा दावा करणारी माणसे गल्लोगल्ली सापडतात, तर मग 10 हजार लोकसंख्येच्या या गावात जगभरातील लोक भविष्य जाणून घेण्यासाठी का येतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दिव्य मराठीची टीम भीलवाडा जिल्ह्यापासून अवघ्या 25 किमी दूर असलेल्या करोई येथे पोहोचली. आम्ही गावात पोहोचलो तेव्हा गावात सर्वत्र ज्योतिषांचे फलक लागले होते. करोईचे सरपंच म्हणाले की, गावची लोकसंख्या 10 हजार आहे. त्यातील केवळ 20 कुटुंबे भृगु ज्योतिषशास्त्राच्या मदतीने अचूक भविष्यवाणी करतात.

येथे लहानपणापासूनच मुलांना ज्योतिष विद्याचे ज्ञान दिले जाते. कुंडली बनवण्यापासून भविष्य पाहण्यापर्यंत ही मुले कुणाहूनही कमी नाहीत.
येथे लहानपणापासूनच मुलांना ज्योतिष विद्याचे ज्ञान दिले जाते. कुंडली बनवण्यापासून भविष्य पाहण्यापर्यंत ही मुले कुणाहूनही कमी नाहीत.

70 वर्षांपूर्वी वृंदावनहून पोहोचली विद्या

दिव्य मराठीची टीम तरुण ज्योतिषी योगेश शास्त्री यांच्याकडे पोहोचली. ते म्हणाले -करोईत पूर्वी पंचांग पाहूनच भविष्य सांगितले जात होते. पण, 70 वर्षांपूर्वी वृंदावनचे एक पंडित भागवत करण्यासाठी आले. ते पंडित नाथूलाल व्यास यांच्या घरी थांबले. त्यांनी व्यास यांना ज्योतिष विद्येच्या भृंगु संहिता शास्त्राची माहिती दिली. तेव्हापासून नाथूलाल भृगु विद्येच्या मदतीने ज्योतिष सांगू लागले. त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांपर्यंत ही विद्या पोहोचली.

प्रतिभा पाटील राष्ट्रपती होतील, अशी भविष्यवाणीही येथून झाली होती. त्यानंतर पाटील यांनी त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रणही देण्यात आले होते.
प्रतिभा पाटील राष्ट्रपती होतील, अशी भविष्यवाणीही येथून झाली होती. त्यानंतर पाटील यांनी त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रणही देण्यात आले होते.

प्रतिभा पाटील राष्ट्रपती होण्याची भविष्यवाणी केल्यानंतर हे कुटुंब चर्चेत आले होते. त्यांना पाटलांच्या शपथविधी सोहळ्याला बोलावण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदींनीही येथे येऊन आपली कुंडली दाखवली होती. त्यानंतर स्मृती इराणी, जयाप्रदा, अमरसिंह यांच्यासह अनेक बडे नेते व उद्योगपतींनीही येथे भेट दिली आहे.

2014 मध्ये स्मृती इराणी यांनीही येथे येऊन आपली कुंडली दाखवली होती. त्यावेळी त्या केंद्रीय मंत्री होत्या.
2014 मध्ये स्मृती इराणी यांनीही येथे येऊन आपली कुंडली दाखवली होती. त्यावेळी त्या केंद्रीय मंत्री होत्या.

विनाकुंडलीची गणना

पंडित योगेश शास्त्री यांनी सांगितले की, करोई गावात भृगु ज्योतिषाच्या आधारावर गणना केली जाते. ते अंकगणितातून कोणतीही जन्मपत्रिका व जन्मतिथीचे भविष्य सांगतात. ते सांगतात की कुंडली तयार करुन कोणत्याही अंकावर बोट ठेवतात. त्यानंतर त्या आधारावर गणना करतात. लग्न दीड तासांचे असते. कर्क, मकर लग्न किंवा इतरांच्या हस्तरेषेच्या आधारावरही ते संपूर्ण कुंडली काढतात. ​​​​​​​

येथे अनेक मोठे राजकारणी स्वतःची कुंडली घेऊन आलेत. काँग्रेस गुजरातचे प्रभारी रघु शर्माही येथे येऊन गेलेत.
येथे अनेक मोठे राजकारणी स्वतःची कुंडली घेऊन आलेत. काँग्रेस गुजरातचे प्रभारी रघु शर्माही येथे येऊन गेलेत.

रशिया, फ्रान्सहून अनेकजण येतात

करोई गावात अमेरिका, फ्रान्स, रशिया, कतार सारख्या अनेक देशांतील व्यक्ती भविष्य जाणून घेण्यासाठी येतात. यात सर्वाधिक नेतेमंडळी असतात. दिल्ली, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेशासह देशात कुठेही निवडणूक असली, तरी नेते करोईत येतात. येथे दररोज 300 ते 400 जण तर रविवारी 1000 जण आपले भविष्य पाहण्यासाठी येतात.

बातम्या आणखी आहेत...