आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Kashmir, Separatists Have Been Hounded, Arrested, The Leaderless Hurriyat Conference Wiped Out.

शांततेच्या मार्गावर:काश्मिरात फुटीरवाद्यांचे कंबरडे माेडले, अटकसत्र, नेतृत्वहीन हुरियत काॅन्फरन्सचा सफाया

हारुणा रशीद । श्रीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमध्ये शांततेचा मार्ग खुला हाेऊ शकताे. कारण फुटीरवादी संघटनांचे कंबरडे माेडले आहे. सर्वात माेठा सफाया हुरियत काॅन्फरन्सचा झाला आहे. हुरियतच्या आवाजावर काश्मीर चालू किंवा बंद हाेत, असेही दिवस हाेते. ते इतिहासजमा झाले आहेत. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने फुटीरवादी गटाच्या विराेधातील कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. पूर्वी अनेक फुटीरवादी नेते पाेलिस सुरक्षा, बुलेटप्रूफ वाहनांचा आनंद घेत हाेते. परंतु हल्ल्यानंतर सरकारने या सुविधा काढून घेतल्या.

शब्बीर शाह, नईम खान, यासीन मलिकसारख्या डझनावर नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. यासीन मलिकला दहशतवाद्यांना आर्थिक रसद प्रकरणात जन्मठेप झाली आहे. आणखीही दाेन खटले सुरू आहेत. त्याशिवाय आसिया अंडरबीदेखील तुरुंगात आहे. त्याचबराेबर हुरियतसमाेर पक्षांतराचेही संकट आहे. अनेक नेत्यांनी गट साेडून मूळ प्रवाहातील राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. हुरियत संस्थापकांपैकी अब्बास अन्सारीच्या मृत्यूनंतर संघटना संपुष्टात आल्यासारखी आहे.

शब्बीरचे २२ लाखांचे घर जप्त ईडीने शुक्रवारी माेठी कारवाई करताना फुटीरवादी नेता शब्बीर शाहच्या घराचा ताबा घेतला. शाहवर फंडिंग प्रकरणात श्रीनगर येथील शाहच्या याघराची किंमत २२ लाख रुपये आहे.

गिलानी गटही संपुष्टात
सय्यद शाह गिलानींचा सप्टेंबर २०२१ मध्ये मृत्यू झाला. ताे हुरियतासाठी माेठा झटका हाेता. गिलानीचा जावई अल्ताफ याच्यावर टेरर फंडिंग प्रकरणात अटक झाली हाेती. त्याचा दीर्घ आजाराने ऑक्टाेबर २०२२ मध्ये रुग्णालयात मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...