आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Kashmir The First Branch, Many Congress Leaders Left The Party | Marathi News

आझाद पक्ष स्थापणार:काश्मिरात पहिली शाखा, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला; जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला खिंडार

नवी दिल्ली/ जम्मू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलाम नबी आझाद काँग्रेसचा त्याग केल्यानंतर आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत. येत्या १५ दिवसांत याच्या जम्मू-काश्मीर शाखेची स्थापना होईल. याआधी आपल्या समर्थकांशी विचारविनिमय करण्यासाठी ते ४ सप्टेंबरला जम्मूत येत आहेत. आझाद यांनी शुक्रवारी सांगितले होते की, सध्या राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याची कोणतीही घाई नाही. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीची शक्यता पाहता तेथे लवकरच शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आझाद यांचे निकटवर्तीय नेते जी. एम. सरुरी यांनी शनिवारी नव्या पक्ष स्थापनेस दुजोरा देत सांगितले होते की, आझाद यांच्या जाण्याने राज्यात काँग्रेस जवळपास संपुष्टात आली आहे. अनेक माजी मंत्री, आमदार, जिल्हा आणि तालुक्यातील विकास परिषदेतील सदस्यांसह १२ पेक्षा जास्त नेत्यांनी आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे सरुरी म्हणाले, जम्मू-काश्मीरची ५ ऑगस्ट २०१९ आधीची म्हणजे कलम ३७० हटवण्याआधीची स्थिती बहाल करणे पक्षाच्या जाहीरनाम्याचा भाग असेल. आझाद यांच्यावर भाजपसोबत साटेलोटे करण्याच्या काँग्रेसच्या आरोपावर सरुरी म्हणाले, त्यांच्यावर टीका करणारे वास्तवाकडे डोळेझाक करत आहेत. काँग्रेस नेतृत्वामुळे आझाद यांना राजीनामा देणे भाग पडले. ते एक धर्मनिरपेक्ष नेते आहेत. मात्र, आता जो पक्ष त्यांचा अपमान करतो त्या पक्षात ते कसे राहू शकतील, असा सवाल सरुरी यांनी केला.

जी-२३ चे पत्र गांभीर्याने घेतले असते तर ही वेळ नसती : तिवारी
काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणाले, दोन वर्षांपूर्वी आझाद यांच्यासह आम्ही २३ नेत्यांनी (जी-२३) सोनिया गांधींना पत्र लिहून नमूद केले की, काँग्रेसची स्थिती चिंताजनक आहे आणि ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. यानंतर काँग्रेस सर्व निवडणुका हरली. तिवारी म्हणाले, डिसेंबर २०२० मध्ये सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीत मान्य झालेल्या बाबी लागू केल्या असत्या तर अशी स्थिती आली नसती. काँग्रेसच्या स्थापनेनंतर भारतासोबतच्या त्यांच्या समन्वयाला तडे गेले.

बातम्या आणखी आहेत...