आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाद्रींनी कुठे पाहून प्रार्थना करावी, या वादाला हिंसक वळण; 35:केरळमध्ये परंपरावादी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात आधुनिक गट सरसावला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

के.ए.शाजी | तिरुवनंतपुरम

केरळमध्ये रोमन कॅथोलिक चर्च रविवारी होणाऱ्या “होली मास’च्या एका प्रथेवरून विभागली. अनेक ख्रिश्चन संघटनांनी केलेला हिंसक विरोध एवढा होता की, ३५ चर्च बंद कराव्या लागल्या. त्यांच्याबाहेर पोलिस तैनात करावे लागले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शांतता कायम झाल्यानंतर चर्च प्रार्थनेसाठी उघडल्या जातील.

ख्रिश्चन समुदायाच्या मान्यतेनुसार, ईश्वराने ६ दिवसांत जगाची निर्मिती केली आणि ७ व्या दिवशी आराम केला होता. यामुळे ख्रिश्चनही रविवारी येशू ख्रिस्ताची पूजा करतात. या पूजेस होली मास म्हटले जाते. रोमन कॅथोलिक चर्चची स्थानिक शाखा सिरो मालाबारने निर्देश जारी करत सांगितले की, याच्या प्रार्थनेदरम्यान पाद्री आणि भक्तांचे तोंड पूर्व दिशेकडे असेल. मात्र, केरळच्या आधुनिक कॅथोलिक ख्रिश्चनांच्या दाव्यानुसार, ही बाब कुठेही लिहिली नाही. यामुळे अनुयायी पाद्रीना पाहू शकत नाहीत आणि त्यांच्याशी संवाद करू शकत नाहीत.

सर्वांना आदेश मान्य नाही, २ हजार वर्षे जुन्या चर्चची प्रतिष्ठा पणाला नवीन निर्देश लागू करणारे सिरो मालाबार कॅथोलिक चर्च सुमारे २ हजार वर्षे जुने आहे. ते केरळमधील सर्वात जुने चर्च मानले जाते. मात्र, याच्या नव्या निर्देशाविरुद्ध होणारा हिंसक विरोध दर्शवतो की, चर्चची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निर्देशाचे पालन केले जात नसेल तर चर्चचे वर्चस्व संपुष्टाकडे जाऊ शकते.

स्थानिक चर्चचाही सर्वोच्च परिषदेसमोर नाइलाज िसरो मालाबार रोम कॅथोलिक चर्चचा सर्वोच्च परिषदेसमोर नाइलाज झाला आहे. सर्वोच्च परिषदेनेच नवीन निर्देश जारी केला होता. विभागीय शाखांची जबाबदारी ते लागू करण्याची आहे. अशात सिरो मालाबार संकटात आहे. एकीकडे लोक विरोध करतात आणि दुसरीकडे आदेशाचा दबाव आहे.

नियम हा की, अर्धा वेळ अनुयायांना पाहिले जावे ख्रिश्चन समुदायाच्या तज्ज्ञांनुसार, नियम असे सांगतो की, प्रार्थनेदरम्यान पाद्रींनी निम्मा वेळ अनुयायींकडे पाहिले पाहिजे. उर्वरित काळ पूर्व दिशेकडे पाहिले पाहिजे. मात्र, आधुनिक ख्रिश्चनांनी ते मान्य करण्यास नकार दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ५० वर्षांपासूनची प्रथा सुरू राहिली पाहिजे.

पोपच्या परवानगीशिवाय आदेश मानण्याचा दबाव अल्माया मुन्नेट्टम संघटनेनुसार, आम्ही पोप फ्रान्सिस यांची परवानगी घेतली की,आमच्या चर्चमध्ये लोकांकडे पाहून प्रार्थना होईल. मात्र, आता आमच्यावर नवा आदेश मानण्यासाठी दबाव केला जात आहे. आदेश मागे न घेतल्यास रोमन कॅथोलिक चर्चला गंभीर परिणाम भाेगावे लागतील,असा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...