आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Kerala, The Number Of Corona Patients Has Decreased By 33% In 5 Days, While Maharashtra Is On The Same Path

कोरोना:केरळात 5 दिवसांत 33% टेस्ट घटवल्याने कोरोना रुग्णांत घट, महाराष्ट्रही त्याच मार्गावर; टेस्ट घटवल्याने देशात रोजचे रुग्ण 43 हजारांवरून 36 हजार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने घटत आहे. नवी रुग्णवाढ ४३ हजारांवरून घटून ३६ हजारांवर आली आहे. मात्र यामागे फक्त केरळ व महाराष्ट्रात रुग्ण घटल्याचे कारण आहे. म्हणजे देशात संसर्गाची एका आठवड्यापूर्वीची स्थिती आजही कायम आहे. संसर्ग कमी झाल्यामुळे केरळात रुग्ण घटलेले नाहीत. तेथे चाचण्याच घटवल्या आहेत. केरळात ३ ऑगस्टनंतर रोजच्या कोरोना चाचण्या ३३%पर्यंत घटवल्या आहेत. यामुळेच रोजचे रुग्ण २४ टक्क्यांनी कमी आढळू लागले आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात ५ ऑगस्टनंतर चाचण्या १०% पर्यंत घटवण्यात आल्या आहेत.

केंद्राला नोटीस
लसीच्या ट्रायलवरील याचिकेवर केंद्र, आरोग्य मंत्रालयाला सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली. याचिकेत लस क्लिनिकल ट्रायलचा डेटा सार्वजनिक करण्यात मागणी केलेली आहे.

केरळात संसर्गाचा दर वाढून १४ टक्के
केरळमध्ये चाचण्या घटवल्याने ६ दिवसांतच संसर्गाचा दर १२% ने वाढून १४% झाला आहे. डब्ल्यूएचओनुसार, संसर्ग दर ५% पेक्षा जास्त असल्यास महामारी नियंत्रणाबाहेर असल्याचे समजले जाते. महाराष्ट्रात नवे रुग्ण घटले असले तरी संसर्ग दर ३ टक्क्यांच्या खाली आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...