आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:मणिपुरातील किरेम्बिखोक गावातील 80% महिला करतात सुतारकाम, मुले शिकतात बोर्डिंग स्कूलमध्ये

इंफाळ / एल. नृपेश्वर शर्मा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्या महिलांची कथा, ज्या बदलताहेत गावाचे चित्र..

मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३२ किमी अंतरावरील तोबल जिल्ह्यातील गाव- किरेम्बिखोक. १५०० लोकवस्तीच्या या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ८०% महिला सुतारकाम करतात. म्हणजे करवत, रंधा व हातोडी चालवून फर्निचर तसेच दरवाजेही तयार करण्याचे काम करतात. दरमहा ८ ते १० हजार रुपयांची कमाई होत आहे. आणखी एक ओळख म्हणजे गावात कोणीच बेरोजगार नाही. पतीला कामात मदत केल्याने उत्पन्न दुप्पट झाले.

गावातील अहोमसांगबाम राधामणी सांगतात की, २० वर्षांपूर्वी पती सुतारकाम करायचे. एकट्याच्या कमाईतून घराचा खर्च निघायचा नाही. मला शेतीत काम मिळत नव्हते म्हणून ठरवले की, कारखान्यात पतीला मदत करायची. कारखाना मालक कांगजम इनाओबीकडे काम मागितले. होकार मिळताच कामाला लागले. आठवडाभरातच गावातील पाच-सहा इतर महिलाही कामाला लागल्या व आज बहुतांश महिला याच कामात आहेत. फर्निचर कंपनीचे मालक कांगजम सांगतात, महिलांनी त्या पुरुषांच्या तुलनेत मागे नसल्याचे दाखवून दिले. यामुळे येथील प्रत्येक कुटुंब २०-३० हजार रुपयांपेक्षा जास्तीची कमाई करत आहे.

किरेम्बिखोक गावातील सेलाइबाम जीबन सांगतात की, गावातील प्रत्येकाच्या हिमतीने गावाचे पूर्ण चित्र बदलले आहे. महिला आता स्वयंसहायता गटाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आपल्या कमाईतून करत आहेत. मुलांना राजधानीतील बोर्डिंग स्कूलमध्ये शिकवत आहेत. एक वेळ होती की, तेव्हा त्या मुलांना खासगी शाळेत पाठवू शकत नव्हत्या.

बातम्या आणखी आहेत...