आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पूर्वेकडील लडाखमधील सैन्याने माघार घेण्याचा निर्णय बैठकीच्या नवव्या फेरीत झाला होता. आता हे प्रकरण संपवूया, असे चिनी कमांडरने म्हटले होते. आम्ही मानसिक आणि शारीरिकरीत्या कंटाळलो आहोत. या संभाषणाची वैशिष्ट्ये जाणून घेणाऱ्या लष्कराच्या एका स्रोताने सांगितले की, भारतीय सैन्यापुढे अशी परिस्थिती उद्भवली नाही. सैनिकांना १०० टक्के तंदुरुस्त ठेवण्याचे धोरण अवलंबले आले.
भारतीय लष्कराने पेगोंग त्सोच्या उत्तर टोकाच्या शिखरावर आणि पूर्व लडाखमधील देपसांग येथून कैलास रेंजच्या दक्षिणेवर दहा महिने सैन्य तैनात केले. तेथून सैन्य आता परत येत आहे. सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉक्टर, भौतिकशास्त्रज्ञ, प्रशिक्षक आणि ग्राउंड कमांडर्स यांनी हा संपूर्ण रणनीती आराखडा तयार केला होता. शून्य हवामान दुर्घटनेचे लक्ष्य ठेवले होते. ते १०० टक्के साध्य झाले. अशा हवामानाचे आव्हान होते ऑक्सिजनचा अभाव. विशेष म्हणजे आरोग्यावर केवळ एक टक्का परिणाम झाला.
हवामानाचा पराभव करण्याची ही चार शस्त्रे
फुट बाथ: सैनिकांना पाय कोरडे ठेवावे लागत होते. नियमित पायांची बोटे रुमालाने स्वच्छ करणे व मॉइश्चरायझर लावण्याचा प्रोटाेकॉल पाळला.
वॉटर परेड: डिहायड्रेशन रोखण्यासाठी दर दोन तासांनी वॉटर परेड व्हायची. जवान १ लिटर पाणी संपवायचे.
टाॅवल परेड: अंघोळीऐवजी गरम टॉवेलने स्पंजिंग करणे हा एक पर्याय होता. यात प्रत्येक शिपायाने आपल्या सहकाऱ्यांचे शरीर गरम टॉवेलने पुसले.
मेडिकल परेड: प्रत्येक सैनिकाचा नियमित रक्तदाब, तापमान, फुप्फुस व इतर अवयवांचे निरीक्षण केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.