आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Lockdown, The Laborers Were Forced To Drink The Bread Of The City, The Milk That Fell In The Ground; News And Live Updates

लॉकडाऊनमधील असहायतेचा व्हिडिओ:कानपुरमध्ये पोटाची आग विझवण्यासाठी युवकाने प्यायले चक्क रस्त्यावरचे दूध; दया आल्यावर लोकांनी दिले भोजन

कानपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा प्रसंग कानपूर जिल्ह्यातील सुतारखाना येथील असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून कित्येक लोक बेरोजगार झाले आहे. दरम्यान, देशातील असंघटीत क्षेत्रातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. याचाच प्रत्यय म्हणून उत्तर प्रदेशातील कानपुर शहरामध्ये एका युवकाने पोटाची आग विझवण्यासाठी चक्क रस्त्यावरचे दूध प्यायले आहे. यावरुन लॉकडाऊनमध्ये लोक किती असहाय झाले आहे हे लक्षात येते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून हा प्रसंग कानपूर जिल्ह्यातील सुतारखाना येथील असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, दिव्य मराठी या व्हायरल व्हिडिओबाबत अद्याप पुष्टी देत नाही.

सुतारखान्यातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी एका दुधावाल्याची सायकल पलटी होऊन दूध रस्त्यावर सांडले होते. दरम्यान, तेथून एक तरुण जात असताना त्याने रस्त्यावर पसलेले दूध बघितले. त्या तरुणाला खूप भूक लागली असल्याने आपला गुडघा रस्त्यावर टेकत त्याने चक्क रस्त्यावरील दूध प्यायला सुरुवात केली. हे पाहून लोकांना त्याच्यावर दया आली आणि त्याला त्यांनी भोजन आणून दिले.

कारखान्यांमध्ये मौन, कामगार बेरोजगार
उत्तर प्रदेशात दीर्घकाळ लॉकडाऊनमुळे कामगारांसमोर अन्नाचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनामुळे लावलेल्या या लॉकडाऊनमुळे बरेच कामगार बेरोजगार झाले आहेत. विशेष म्हणजे कानपूर हे देशातील औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या संख्येने कामगार कारखाने व छोट्या कारखान्यांमध्ये काम करतात. लॉकडाऊन दरम्यान अनेक युनिट्स बंद झाले असल्यामुळे यामधील काम करणारे कामगार अस्वस्थ आहेत.

बातम्या आणखी आहेत...