आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In Madhya Pradesh Tikamgarh District Girls Village; Name Of Girl On Every Tree And House News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलींचे गाव:मध्यप्रदेशातील टिकमगडमधील ‘मुलींचे गाव,’प्रत्येक वृक्ष, घरावर मुलींचे नाव

टिकमगड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलगा भाग्याने घरात जन्म घेतो तर मुली सौभाग्याने होतात. गावातील शिवराज लोधी सांगतात

मध्य प्रदेशात टिकमगड जिल्ह्यातील हरपुरा मडिया गाव. येथे प्रत्येक झाड, प्रत्येक घरावर मुलींचे नाव टाकण्यात आले आहे. या गावातील ज्येष्ठांनी गावात कधीच भ्रूण लिंग परीक्षण आणि भ्रूण हत्येची वेळ येऊ दिलीच नाही. याचा परिणाम म्हणून आज त्याला ‘मुलींचे गाव’ म्हणून ओळख मिळाली आहे. या गावात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्या घरात एक मुलगा व पाच- पाच मुली आहेत. यामुळेच केवळ २१०७ लोकसंख्येच्या या गावात आज १००० पुरुष आणि ११०७ महिला आहेत. तर पूर्ण जिल्ह्यात १००० पुरुषांमागे ९०१ महिला आहेत. मुली व महिलांच्या शिक्षणाबाबतही हे गाव सजग आहे. यामुळे गावात ज्ञानालयही सुरू करण्यात आले आहे. गावातीलच इंद्रकुमारी लोधी आणि रजनी विश्वकर्मासह चार मुली महिलांना शिक्षित करण्याचे काम करत आहेत. यामुळे हरपुरा गावातील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाणही ८५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

सौभाग्याने होतात मुली
गावातील लोकांना ८० वर्षांच्या गुलाबराणी नेहमीच सांगतात, मुलीला कधीच ओझे समजू नका. मुलगा भाग्याने घरात जन्म घेतो तर मुली सौभाग्याने होतात. गावातील शिवराज लोधी सांगतात, सध्या माझ्या कुटुंबात एकाच वेळी चार पिढ्या आहेत. कुटुंबात महिलांचे जास्त वर्चस्व आहे. आम्हा चारही भावांकडे आठ नातींचा जन्म झाला आहे. तर चार नातू आहेत. आम्ही मुलगा- मुलगी कधीच फरक केला नाही. जेवढे प्रेम मुलांना देतो, त्यापेक्षा जास्त मुलींचे लाड करतो.

बातम्या आणखी आहेत...