आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुजफ्फरनगर:आता मतांवर वार करावा लागेल; महापंचायतमध्ये नेत्यांची भूमिका, देशभरातून शेतकऱ्यांचा सहभाग

मुजफ्फरनगर / एम. रियाझ हाश्मी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी २८ जानेवारी राेजी गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदाेलनात आपल्या अश्रूंनी सिंचन केलेले पीक रविवारी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये चांगले फाेफावल्याचे दिसून आले. केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांच्या विराेधात आयाेजित महापंचायतसाठी देशभरातील शेतकरी सकाळी सहा वाजेपर्यंत मुजफ्फरनगरमध्ये दाखल झाले. उत्तर प्रदेश व परिसरातील शेतकऱ्यांचे आगमन दुपारपर्यंत सुरूच हाेते. महापंचायतमध्ये शेतकरी नेते राजकीय शेती करताना दिसून आले. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी जाेरदार टीका केली. १० फूट उंच व्यासपीठावरून टिकैत यांनी सरकारवर देश विकल्याचे टीकास्त्र साेडले. आता लढाई मिशन यूपी किंवा मिशन उत्तराखंडची नाही. संपूर्ण देशाला वाचवण्यासाठी लढाई सुरू आहे. हे आंदाेलन देशातील शेतकऱ्यांच्या बळावर लढले जाईल. टिकैत म्हणाले, मी शेतकरी आहे आणि शेतकरीच राहणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाेबत राहील. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्षात आम्ही नेहमी शेतकऱ्यांसमवेत आहाेत.

महापंचायतमध्ये मेधा पाटकर यांनीही हजेरी लावली. पाटकर म्हणाल्या, आपण मतांवर वार केला पाहिजे. माेदींनी नाेटबंदी केली हाेती, परंतु आपण व्हाेटबंदी करून माेदी-याेगींना पराभूत केले पाहिजे. मुजफ्फरनगरहून मिशन यूपीची सुरुवात झाली आहे. आम्ही वाराणसी, लखनऊ, गाेरखपूरमध्ये भाजपच्या िवराेधात प्रचार करू. भाजपचे लाेक ताेडण्याची भाषा करत आहेत. आपण जाेडण्याबद्दल बाेलत आहाेत. महापंचायतच्या मंचावर राजकीय नेत्यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे रालाेदचे अध्यक्ष जयंत चाैधरी यांनी शेतकऱ्यांवर हेलिकाॅप्टरने पुष्पवर्षाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मागितली हाेती. परंतु परवानगी मिळाली नाही. हरियाणाचे १८, उत्तराखंड, मध्ये प्रदेशातील १२ शेतकरी नेत मंचावर हाेते. पंजाबच्या ३१ नेत्यांचीही उपस्थिती हाेती. महापंचायतमुळे शहरात ४ हजार पाेलिस, १० निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात हाेत्या.

याेगींचे पाेस्टर फाडले, दाेन तास इंटरनेट सेवा बंद
शहरभर लागलेले मुख्यमंत्री माेठमाेठे हाेर्डिंग संतापलेल्या शेतकऱ्यांनी फाडून टाकले. याच काळात शहरातील माेबाइल-इंटरनेट सेवा दाेन तासापर्यंत बंद हाेती. फेसबुकही बंद हाेते. माझ्या अकाउंटपर्यंत मला जाता येत नाही, असे टिकैत यांनी सांगितले. महापंचायतच्या यशामुळे केंद्र सरकार भडकले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...