आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Maharashtra, On An Average 34 People Die Every Year Due To Drug Addiction, More People Have Died Due To Drugs In These States Than Here.

देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट:महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 34 लोकांचा अंमली पदार्थांच्या सेवनाने होतो मृत्यू, राजस्थानमध्ये व्यसनांमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये 61% घट

लेखक: विनोद यादव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे मृत्यू 61 टक्क्यांनी घटले

देशात गेल्या तीन वर्षांत दरवर्षी सरासरी 112 लोकांचा अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासा देणारी बाब आहे की औषधांच्या अतिसेवनामुळे मृत्यूच्या घटना 20 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. 2017 ते 2019 दरम्यान महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या व्यसनामुळे एकूण 102 लोकांचा मृत्यू झाला, जे क्रूज ड्रग्स पार्टीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 34 लोक अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मरतात.

राजस्थानमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे मृत्यू 61 टक्क्यांनी घटले
NCRB च्या आकड्यांनुसार, राजस्थानमध्ये 2017 मध्ये 125, 2018 मध्ये 125 आणि 2019 मध्ये 60 लोकांचा अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू झाला. अशा प्रकारे राजस्थानमध्ये 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये व्यसनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत 60.78 टक्के घट झाली. मध्य प्रदेशात 2017 ते 2019 दरम्यान अंमली पदार्थांमुळे एकूण 140 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 22 महिला आणि 118 पुरुषांचा समावेश आहे.

NCRB नुसार देशात 2019 मध्ये 704 लोकांचा जीव अंमली पदार्थांच्या सेवनामुळे झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त 108 लोकांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये झाला. तर कर्नाटकात 67 आणि उत्तर प्रदेशात 64 लोकांचा मृत्यू अमली पदार्थांच्या सेवनामुळे झाला. 2017 मध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने सर्वाधिक 125 लोकांचा जीव राजस्थानमध्ये गेला होता. तर 2018 मध्येही राजस्थानमध्ये सर्वाधिक 153 जणांचा मृत्यू अंमली पदार्थांच्या सेवनामुळे झाला.

'उडता पंजाब'मध्ये काय आहे अंमली पदार्थांच्या सेवनाची स्थिती
अभिनेता शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट 'उडता पंजाब' मध्ये तरुणांची व्यसनाधिनता दाखवली होती. पंजाबमध्ये 2019 मध्ये 45, 2018 मध्ये 78 आणि 2017 मध्ये 71 लोकांचा मृत्यू व्यसनाधिनतेमुळे झाला. तर 2019 मध्ये देशात व्यसनाधिनतेमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी पंजाबमध्ये 6 टक्के मृत्यू झाले. 2017 मध्ये हा आकडा 9.5 टक्के आणि 2018 मध्ये 9 टक्के होता.

देशात नश्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे आकडे
2019 मध्ये 704 मृत्यू
2018 मध्ये 878 मृत्यू
2017 मध्ये 745 मृत्यू

देशाच्या प्रमुख राज्यांमध्ये व्यसनाधिनतेमुळे तीन वर्षांत मृत्यू

क्रमांकराज्य201920182017एकूण मृत्यू
1राजस्थान60153125338
2महाराष्ट्र72867102
3मध्य प्रदेश447719140
4उत्तर प्रदेश648884236
5तामिळनाडू1084648202
6कर्नाटक679181239
7गुजरात493231112
बातम्या आणखी आहेत...