आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In Malot Of Muktsar, BJP MLA From Abohar, Arun Narang, Was Beaten By Farmers, Tore Up Clothes And Waved

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंजाबमध्ये भाजप आमदाराला जमावाची बेदम मारहाण:कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेण्यासाठी आले होते अरुण नारंग

मलोट (मुक्तसर)21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांनी पोलिसांच्या हातातून खेचले आणि कपडे फाटेपर्यंत मारहाण केली

कृषी कायद्याचा विरोध करणारे शेतकरी आता कायदे हातात घेऊ लागले आहेत. शनिवारी शेतकऱ्यांनी पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये भाजप आमदार अरुण नारंग यांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेत अरुण नारंग यांचे कपडे फाटले असून, त्यांना दुखापतही झाली आहे. अरुण नारंग अबोहरचे आमदार आहेत.

शेतकऱ्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड

अरुण नारंग कृषी कायद्याच्या समर्थनार्थ एक पत्रकार परिषद घेण्यासाठी मलोटला आले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या येण्याची बातमी कळतचा शेकडो शेतकरी मलोटमधील भाजप कार्यालयाच्या बाहेर जमा झाले. शेतकरी जमा होताना दिसताच पोलिसांनी अरुण नारंग यांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांनी पोलिसांच्या हातून अरुण नारंग यांना खेचले आणि कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. यानंतर पोलिसांनी कसेबसे नारंग यांना एका दुकानात नेले. यानंतर शेतकऱ्यांनी त्या दुकानाबाहेर घोषणाबाजी करत नारंग यांच्या गाडीची तोडफोड केली.

बातम्या आणखी आहेत...