आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Order To Earn Four Paise More For Prapancha, His Mother Used To Wash Utensils In Other People's House And Also Run Charkha; A Passionate Blog Written By The Prime Minister On The 100th Birthday Of Hiraben Modi |marathi News

दिव्य मराठी विशेष:प्रपंचासाठी आई दुसऱ्यांच्या घरी भांडी घासण्याचे काम करत, चरखाही चालवत असे; पंतप्रधानांचा भावुक ब्लॉग

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन मोदी यांच्या १०० व्या जन्मदिनानिमित्त गांधीनगरला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मोदी यांनी आपले अधिकृत संकेतस्थळ (www.narendramodi.in) यावर ‘माँ’ शीर्षकाखाली एक ब्लॉग लिहिला आहे. त्यात मोदींनी सर्व आठवणी ताज्या करून जीवनातील आईचे महत्त्व मांडले आहे. त्यात ते म्हणाले, ‘आई’ हा केवळ एक शब्द नाही. स्नेह, धैर्य, विश्वास आणि खूप काही असलेली ही जीवनातील भावना आहे. आई केवळ आपले शरीरच ठरवत नाही, तर आपले मन, आपले व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वासही घडवण्याचे काम करते. प्रपंचाला चार-दोन पैसे जास्त मिळावे म्हणून आई दुसऱ्यांच्या घरी भांडीही घासत असे. वेळ काढून चरखादेखील चालवायची. कारण त्यातूनदेखील काही पैसे मिळत असत. कपाशीच्या बोंडातून रुई काढण्याचे काम, रुईपासून धागे बनवण्याचेही काम ती करत असे. बोंडाच्या सालीचे काटे आम्हाला टोचतील, अशी तिला भीती वाटायची. अक्षरज्ञान नसतानाही एखादी व्यक्ती खरोखरच कशी शिक्षित असू शकते, ही गोष्ट मी आईमध्ये पाहिली.

मातीच्या घराला खिडकी नव्हती, शौचालयही नव्हते
लहानपणीच्या संघर्षामुळे माझी आई कमी वयात परिपक्व झाली होती. ती माहेरी भावंडांत थोरली होती. विवाहानंतर सासरी आल्यावरही ती थोरली सून होती. लहानपणी घरी ती सर्वांची चिंता करत, सर्वांची काळजी घेत असत. तेव्हा ती सर्व जबाबदारीही घेत असे. अगदी तशाच प्रकारे तिने सासरी आल्यावरही सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. आमच्या घराला खिडकी नव्हती. शौचालय देखील नव्हते. मातीच्या भिंती, कौलारूचा दीड-एक खोल्यांचा ढाचा म्हणजे आमचे घर होते.

मित्राच्या मृत्यूनंतर वडिलांनी अब्बासला घरीच आणले होते..
माझ्या वडिलांच्या जिगरी मित्राचा मुलगा म्हणजे अब्बास. मित्राचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांनी अब्बासला आमच्या घरीच आणले होते. एक प्रकारे अब्बास आमच्या घरी राहूनच शिकला. पोटच्या लेकरासारखे आईने अब्बासचेही संगोपन केले. ईदच्या दिवशी आई अब्बाससाठी त्याच्या पसंतीचे पक्वान्न करायची. आईकडूनच मला स्वच्छतेची प्रेरणा मिळाली. मुख्यमंत्री झाल्यावर आईने लाच घेऊ नको, अशी शिकवण दिली होती. आईसोबत सार्वजनिक कार्यक्रमात ते केवळ दोन वेळा सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...