आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतात कोव्हॅक्सिन व कोविशील्ड लसींना मंजुरी मिळूनही लसीकरण सुरू झालेले नाही. याउलट अनेक देशांत मंजुरीच्या आठवडाभरातच लसीकरण सुरू झाले होते.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारत सरकार-सीरम इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी अनेक महिन्यांपासून दरांबाबत वाटाघाटी करत आहेत. मात्र अद्याप अंतिम दरावर एकमत झालेले नाही. विलंबामागील एक कारण म्हणजे - सीरमने कोविशील्डचा दर २०० रुपये सांगितला असून त्यानुसार लस देण्याबाबत सरकारशी तोंडी बाेलणे झाल्याचे कळवले आहे. सीईओ अदर पूनावालांनुसार, खुल्या बाजारात एका डोसची किंमत १ हजार रुपये असेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप सरकारकडून डोसचा दर २०० रुपये असल्याचे म्हटले गेलेलेच नाही. दर निश्चित न झाल्याने लसीकरणाला विलंब होत नाहीय. कोणत्या तारखेपर्यंत किती लसी कोणत्या राज्याच्या स्टोअरपर्यंत पोहोचवायच्या, याबाबत सीरमशी बोलणी सुरू आहेत. सर्व ठरल्यानंतर देशात एकाच वेळी लसीकरण सुरू होईल. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जॅफरीजचे विश्लेषक अभिषेक शर्मा यांच्यानुसार, स्वदेशी कंपनीच्या
मिनिट्स ऑफ मीटिंग :
तज्ज्ञ समितीने कोव्हॅक्सिनच्या मंजुरीची शिफारस केली होती. त्या बैठकीतील मुद्दे (मिनिट्स ऑफ मीटिंग) समोर आले आहेत. १ जानेवारीला समितीने भारत बायोटेकला आणखी डेटा मागितला. मात्र पुढच्याच दिवशी ड्रग कंट्रोलरकडे लसीची शिफारसही केली. समितीने केव्हा काय सांगितले...
१ जानेवारीला समिती म्हणाली, डेटा आपत्कालीन मंजुरीसाठी पुरेसा नाही
तज्ज्ञ समितीने पत्रात लिहिले, ‘कोरोनाच्या बदलत्या स्वरूपावरही लस प्रभावी आढळली आहे. मात्र सादर डेटा आपत्कालीन वापराची मंजुरी देण्यासाठी पुरेसा नाही. सध्याच्या चाचण्या खूप िवस्तृत असून त्या २५,८०० भारतीयांवर होत आहेत. २२ हजार लोकांसाठी त्या सुरक्षित असल्याचे दिसत आहेत. मात्र अद्यापही तिची परिणामकारकता दिसणे बाकी आहे. अंतरिम विश्लेषणाच्या आधारे परिणामकारकतेचा डेटा सादर करावा. यामुळे पुढील निर्णय घेता येईल.
...अन् २ जानेवारीला जनहितार्थ मंजुरी, जेणेकरून लसीचे जास्त पर्याय मिळतील
प्राण्यांवर लसीच्या प्रभावाच्या डेटाला आधार मानून म्हटले की, ‘समिती जनहितार्थ लसीच्या मर्यादित वापराची मंजुरी देत आहे. मंजुरी ट्रायल मोडमध्ये दिली जात आहे. यामुळे लसींचे जास्त पर्यायही मिळतील. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा डेटा सादर करावा.’ मंजुरीसाठी भारत बायोटेकने ‘अपडेटेड डेटा’ व ‘न्यायसंगत उत्तर’ समितीला दिले. मात्र तो ‘अपडेटेड डेटा’ काय, व ‘न्यायसंगत उत्तर’ काय आहे, हे पत्रात सांगितलेच नाही.
८ तारखेला देशात पुन्हा लसीकरणाची रंगीत तालीम; कर्नाटकात ५० वर शिक्षकांना संसर्ग, शाळा पुन्हा बंद
देशभरात ८ जानेवारीला पुन्हा लसीकरणाची रंगीत तालीम होईल. सध्या ती अनेक ठिकाणी सुरूच आहे. दरम्यान, कोरोनाचे नवे रुग्ण आढळणे सुरूच आहे. कर्नाटकातील अनेक शाळांत ५० पेक्षा जास्त शिक्षकांना कोरोना झाल्याचे आढळले आहे. राज्यात १ जानेवारीला शाळा उघडल्या होत्या. अनेक शाळा पुन्हा बंद झाल्या आहेत. बेळगावात २२ शिक्षक बाधित आढळले. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, ‘चिंतेचे कारण नाही, स्थितीवर लक्ष ठेवून आहोत.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.