आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In Other States Too, The Vaccination Campaign Is On Hold, As Is The Case In Various States

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टंचाई:इतर राज्यांतही लसीकरण मोहीम लांबणीवर, अशी आहे विविध राज्यांतील स्थिती

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यानुसार १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी देशात १ मेपासून लसीकरण सुरू होत असले तरी लसींच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्र, झारखंडसह अनेक राज्यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलणार असल्याचे जाहीर केले आहे. ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असली तरी अनेक राज्यांत नोंदणी करूनही लाभार्थींना डोस घेण्यासाठी तारखा मिळू शकल्या नाहीत. दुसरीकडे, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १६.१६ कोटी डोस मोफत उपलब्ध करून दिले असल्याचे स्पष्ट करून तीन दिवसांत आणखी २० लाख डोस मोफत दिले जातील असा दावा केंद्र सरकारने केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, राज्यांकडे सध्या १,०६,०८,२०७ डोस उपलब्ध आहेत. गुरुवारी सकाळी सात वाजेपर्यंत १५,००,२०,६२८ डोस देण्यात आले आहेत.

अशी आहे विविध राज्यांतील स्थिती
गुजरात :
लस मिळत नाही तोपर्यंत मोहीम सुरू करणे कठीण आहे, लस मिळाल्यानंतर तारीख जाहीर करू, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगाल-गोवा : लसीकरणासाठी १८ वर्षांवरील लोकांची नोंदणी सुरू आहे. पण राज्यात नोंदणी करणाऱ्यांना लसीकरणाची तारीख दिली जात नाही. गोव्यातही असेच झाले आहे.

मध्य प्रदेश : राज्याने ४५ आणि ६० वर्षांवरील लोकांचे लसीकरण दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एक मेपासून १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण सुरू व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे.

दिल्ली : राज्य सरकारने १.३ कोटी डोस खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. डोस मिळणे बाकी आहे. एक मेपासून तिसरा टप्पा मोठ्या प्रमाणावर सुरू होण्याची शक्यता नाही. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना तारीख मिळू शकली नाही.

उत्तर प्रदेश : चार ते पाच कोटी डोससाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. मोफत लस देण्याची घोषणा झाली आहे. पण पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे की नाही हे स्पष्ट नाही. सीरम व भारत बायोटेककडून ५०-५० लाख डोस खरेदीचा आदेश देण्यात आला आहे.

लसीबाबत अनिश्चितता : बिहार, ओडिशा, आसाम, झारखंड, छत्तीसगड, आंध्र, तेलंगणा, गोवा, राजस्थान, हिमाचलने लसीसाठी कंपन्यांशी करार केला आहे. पण लसीबाबत अनिश्चितता आहे.

काँग्रेसशासित राज्यांची तक्रार : राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या काँग्रेसशासित राज्यांनी याआधीच लस उपलब्ध नसल्याची तक्रार केली आहे. झारखंडनेही हीच तक्रार केली आहे.

बातम्या आणखी आहेत...