आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Palwadi Village Of Chhattisgarh, Alcohol Ban From 50 Years, Tribal Women Have Launched A Campaign Against Tradition|Marathi News

महिलांनी दारूविरुद्ध उघडली मोहीम:छत्तीसगडच्या पालवाडी गावात 50 वर्षांपासून दारूबंदी लागू, आदिवासी महिलांनी परंपरेविरोधात उघडली मोहीम

रायपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगड हे आदिवासीबहुल राज्य आहे. संस्कृतीचा दाखला देत आतापर्यंत गुजरात किंवा बिहारप्रमाणे येथे संपूर्ण दारूबंदी कायदा झालेला नाही. पण या राज्यात एक गाव असेही आहे, जेथे गेल्या ५० वर्षांपासून महिलांनी दारूविरुद्ध मोहीम उघडली आहे. रायपूर येथून १५० किमीवरील धमतरी जिल्ह्यातील केक राखोली ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या पालवाडी या गावात दारू बनवणे आणि विकणे यावर पूर्णपणे बंदी आहे.आपल्या आदिवासी परंपरा आणि पुरुषप्रधान समाजाविरुद्ध उभ्या असलेल्या महिलांच्या निर्धाराचा हा परिणाम आहे.

आंदोलनाच्या सुरुवातीला रोज कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून महिला एकत्र येऊन दारूबंदीसाठी निघत असत. सरपंच विजय यादव यांनी सांगितले की, अजूनही महिला आठवड्यात एकदा गावात फिरून लोकांना जागरूक करतात. दारूबंदी महिला समितीच्या अध्यक्षा जागेश्वरी नेताम आणि उपाध्यक्षा अनुसूया ध्रुव यांनी सांगितले की, दारू तयार झाली नाही तर खरेदी-विक्री होणार नाही आणि खरेदी-विक्री झाली नाही तर लोक पिणार नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी घटना घडणार नाहीत. पैसा वाचेल. हा पैसा शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक कार्यक्रमांत खर्च केला जाऊ शकतो. या मोहिमेचा परिणाम शेजारच्या गावांवरही झाला आहे. तेथेही दारूबंदी आहे.

बातम्या आणखी आहेत...