आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In Preparation For The Infiltration Of 300 Terrorists On The Kashmir Border, Evidence Of Infiltration Was Received From Pakistan

घुसखोरीचा प्रयत्न:काश्मीरच्या सीमेवर 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, पाककडून घुसखोरीचे पुरावे मिळाले

बारामुल्ला/ श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नौगाममध्ये एलओसीजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील लाँचपॅडवर सुमारे ३०० दहशतवादी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती सैन्याच्या १९ इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी शनिवारी दिली.

जनरल वत्स यांनी सांगितले, दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान पूर्णपणे सतर्क आहेत. पीओकेमधील लाँच पॅडवर दहशतवादी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या तळांवर सुमारे २५० ते ३०० दहशतवादी असल्याचा अंदाज आहे. हिमवर्षावामुळे रस्ता बंद होण्यापूर्वी त्यांच्याकडे कमी कालावधी बाकी असल्याने दशतवाद्यांकडून घुसखोरीचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे.

नौगाम सेक्टरमध्ये एलओसीजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्म-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सैन्याने शनिवारी ठार केले. त्यांच्याकडून दोन एके-४७ रायफल, १२ मॅगेझिन आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. हे दहशतवादी तारेचे कुंपन तोडून शिरले होते. सैन्याने घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सैन्याच्या प्रत्युत्तरात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी ठार झाले.

0