आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्तीसगडची राजधानी रायपूरच्या जिल्हा रुग्णालयात रात्री 8 नंतर 3 मुलांचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी गोंधळ केला. प्रकृती बिघडल्यामुळे या मुलांना ऑक्सिजनविना दुसर्या रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. त्याचबरोबर रुग्णालयात उपस्थित असलेल्या एका रूग्णाच्या कुटूंबाने दावा केला आहे की, 3 नव्हे तर 7 मुलांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी माझ्या स्वत: च्या डोळ्यांनी सात मुलांचे मृतदेह एकामागून एक घेऊन जाताना पाहिले आहे.
एका बालकाचे वडील घनश्याम सिन्हा यांनी असा आरोप केला की, मुलाची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. मुलाची प्रकृती चिंताजनक होती. त्याला घेऊन जाण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता होती, परंतु दिले गेले नाही. रुग्णालय व्यवस्थापनातील लोकांकडे त्यांनी वारंवार सिलिंडरची मागणी केली. यादरम्यान, दाखल झालेल्या आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला आणि नातेवाईकांचा रोष डॉक्टरांवर वाढला. गोंधळाची माहिती मिळताच पंढरी पोलिस ठाण्यतुन पोलिसही पोहोचले.
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अडीच तासानंतर लोक शांत झाले
बालकांच्या इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये बराच वेळ गोंधळ सुरु होता. कुटुंबियांना कोणीही योग्य माहिती देत नव्हते. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या गदारोळानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कुटुंबीय शांत झाले. रात्री 11 वाजेपर्यंत कुटुंबीय तिन्ही मुलांचे मृतदेह घेऊन परत गेले. हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या लोकांनी इतर नातेवाईकांना समजावण्यास सुरुवात केली आणि वातावरण शांत झाले. रुग्णालय व्यवस्थापनाच्या वतीने असे सांगण्यात आले की मुलांचा मृत्यू सामान्य होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.