आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Shringverpur, Prayagraj, More Than 4 Thousand Dead Bodies Were Found In 15 Days, Only Dead Bodies Are Seen Everywhere On The Banks Of The Ganges, It Is Difficult To Count; News And Live Updates

गंगेच्या काठी कोठून येत आहेत मृतदेह:प्रयागराजमधील शृंगारपूरमध्ये नदीकाठी 1 किमीच्या परिघामध्ये एवढे मृतदेह आहेत की मोजणेही जात आहे कठीण

प्रयागराज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने नदी पात्रात मृतदेह दफन करण्यावर बंदी घातली होती.

गंगा नदीच्या पात्रात मृतदेह दफन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने नदी पात्रात मृतदेह दफन करण्यावर बंदी घातली होती. परंतु, तरीदेखील मृतदेह कमी होण्याचे नाव घेत नाही. उलट पूर्वीच्या तुलनेत आता जास्तच मृतदेह येत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील शृंगारपूरमध्ये गंगा नदीच्या काठी मोठ्या प्रमाणावर दफन केलेले मृतदेह आढळले आहे. मृतदेहांची संख्या एवढी मोठी आहे की, मृतदेह मोजणेही कठीण जात आहे. जिकडे दृष्टी पडेल तिकडे फक्त मृतदेहच दिसत आहेत. सुमारे एक किलोमीटर अंतरावर दफन केलेल्या मृतदेहांमध्ये एक मीटरपेक्षा कमी अंतर आहे. यावरुन तेथील परिस्थिती काय असेल यांचा अंदाज येईल.

घाटावर पूजाअर्चा करणारे पंडित सांगतात की, पूर्वी येथे दररोज 8 ते 10 मृतदेह यायचे. पण गेल्या काही दिवसांपासून 60 ते 70 मृतदेह येत असून एखाद्या दिवशी 100 हून अधिक मृतदेह येत आहेत. गेल्या एका महिन्यात येथे 4 हजारांपेक्षा जास्त मृतदेह दफन करण्यात आले आहेत.

प्रयागराज येथे गंगा नदीकाठी दफन करण्यात आलेले मृतदेह
प्रयागराज येथे गंगा नदीकाठी दफन करण्यात आलेले मृतदेह

शैव धर्माचे अनुयायी करत आहेत दफन
सरकारने कोरोनाकाळात अंत्यसंस्कारावर काही प्रमाणात बंदी घातली आहे. तरीदेखील शैव धर्माचे अनुयायी या ठिकाणी आलेल्या मृतदेहांवर अत्यंसंस्कार करत आहे. शैव धर्मीयाकडून दफन करण्याची परंपरा जुनी असून ते थांबवता येणार नसल्याचे घाटावरील एका पंडिताने म्हटले आहे. त्‍यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असेही ते म्हणाले.

मृतदेह दफन करणे चुकीचे, परंतु लोकांचा नाईलाज
गंगा नदीच्या वाळूमध्ये मृतदेह दफन करण्याच्या प्रकाराला तेथीलच पुरोहित प्रविण त्रिपाठी चुकीचे असल्याचे सांगतात. परंतु, स्मशानभूमीतील लाकडाची कमतरता आणि प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केलेली नसल्यामुळे लोक नाईलाजास्तव वाळूमध्ये मृतदेह दफन करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...