आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूर्याच्या उत्तरायणासोबत तामिळनाडूतील गावांमध्ये आशा व मानवतेची प्राचीन परंपरा मोई विरुंधूला सुरुवात झाली आहे. गरजू लोक नवीन काम सुरू करण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज आदी गोष्टींसाठी मोई विरुंधूचे आयोजन करतात. याअंतर्गत गावातील लोकांना भाेजनासाठी बोलावतात. पूर्ण गाव जमते आणि परत जाताना प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार आयोजकाला आर्थिक मदत करतो. जेव्हा आयोजकाची स्थिती सुधारेल तेव्हा तो अशाच प्रकारे गरजू लोकांची मदत करेल, अशी अपेक्षा मदत करणाऱ्याला असते.
‘सोबत खाऊ, सोबत गुंतवणूक करू आणि सोबत पुढे जाऊ’ अशा प्रकारची ही संस्कृती जगात कुठेच दिसत नाही. यामागे आपल्यासोबत इतरांचीही आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारणे हा मूळ हेतू आहे. पुदुकोट्टई जिल्ह्यातील वडकडू गावातील माया थेवर सांगतात, मदत निधीला ‘मोई’ म्हणतात. जो ‘विरुंधू’ चे आयाेजन करतो त्यालाही अशाच प्रकारे पैसे परत द्यावे लागतात. प्रतिष्ठा वाढावी म्हणून त्याला वाटले तर तो रक्कम वाढवून परत देऊ शकतो. अशा प्रकारे मदतीची साखळी तयार होते. एका व्यक्तीला पाच वर्षांत एकदाच असे आयोजन करता येते. पेरुवुरानी गावातील कृष्णकुमार सांगतात, मीदेखील दोन वेळा असे जेवण आयोजित केले आहे. यातून मी ५५ लाख आणि ४५ लाख जमवले. यातून व्यवसाय सुरू केला, घर बांधले. आता मी माझ्या क्षमतेनुसार दुसऱ्या लोकांची मदत करतो. लोक कमीत कमी ५०० रुपये मोई देतात. एखादा सक्षम असेल तो ५ लाख रुपयांपर्यंत मदत करतो. २०१८मध्ये अशाच कार्यक्रमातून ५ कोटी रुपये जमले होते. प्रत्येक जिल्ह्यात एका हंगामात अशा कार्यक्रमातून किती रक्कम जमा होते, याची अधिकृत माहिती मिळत नाही. अंदाजानुसार प्रत्येक जिल्ह्यात २५० कोटींपर्यंत रक्कम जमा होते.
खर्च कमी करण्यासाठी अशा जेवणावळीसाठी २ ते ३० संयुक्त यजमान असतात
पूर्वी एक किंवा दोन व्यक्ती यजमान असायचे. मात्र, आता खर्च वाढल्याने जास्तीत जास्त ३० जण संयुक्त यजमान असतात. विरुंधूसाठी यजमानच निमंत्रण पत्रिका छापतो आणि मोठा हॉल भाड्याने घेतो. एका वेळी ४०० ते १००० किलो मटण आणि १८०० ते २५०० किलो भात केला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.