आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात वर्क फ्राॅम होमची संस्कृती वाढत आहे. साॅफ्टवेअर प्रॉडक्ट कंपनी जोहो वर्क फ्रॉम व्हिलेजच्या माॅडेलवर काम करत आहे. कंपनीने नुकतेच चेन्नईहून ६५० किमी लांब तेनकासी जिल्ह्यातील संुदरई गावात नवीन कार्यालय सुरू केले आहे. येथे सध्या २० कर्मचारी काम करत आहेत. दक्षिण भारतातील लहानशा गावात हे त्यांचे तिसरे कार्यालय आहे. कंपनी लवकरच ७ नवे व्हिलेज ऑफिस सुरू करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने २०१६ मध्ये आपले कार्यालय तेनकासी जिल्ह्यातीलच मत्थलमपराई गावात सुरू केले होते आणि सध्या तेथे ५०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. असेच एक कार्यालय आंध्रातील चित्तूर जिल्ह्यातील रेनीगुंटामध्ये उघडण्यात आले आहे, ज्यात १२० कर्मचारी आहेत. जगभरात ९३०० कर्मचारी असलेली कंपनी जोहोचे तंत्रज्ञान संचालक राजेंद्रन दंडपानी सांगतात की, तसे पाहता अमेरिका, जपान, चीन, सिंगापूर, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि यूएईतही आमची कार्यालये आहेत. मात्र, आता आम्ही लहान लहान गावात बनवत आहोत. ही संकल्पना कंपनीचे सीईओ श्रीधर वेंबू यांची आहे. कुंभकोणमजवळच्या लहानशा गावात जन्मलेले वेंबू यांना गावाच्या जीवनशैलीत काम करणे सोपे वाटते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तेनकासीत स्थलांतरित होण्याआधी वेंबू अमेरिकेतील सॅन जोसच्या कार्यालयातून कंपनी सांभाळायचे. १९८९ मध्ये आयआयटी मद्रासमधून पदवी घेतली आणि त्यानंतर अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीत पीएचडी केली. त्यांना नोकरीसाठी गावातून शहरात जाणे योग्य वाटत नाही. खेड्यातील प्रतिभेला संधी द्यायची आहे. तसेच कर्मचाऱ्यांना शहरातील तणावयुक्त जीवनशैलीपासून लांबही ठेवायचे आहे, यामुळे त्यांनी जेव्हा तेनकासीत कार्यालय सुरू करण्याची योजना सांगितली असता तेनकासी किंवा जवळच्या जिल्ह्यात राहणारे कर्मचारी अर्ध्या वेतनात काम करण्यास तयार झाले. आज ते आणि त्यांच्याप्रमाणेच शेकडो कर्मचारी काम करत आहेत. दंडपाणी सांगतात की, आमच्या येण्यामुळे या गावात चांगले रस्ते, शाळा, हॉटेल, रिक्षा थांबे आणि मंदिर तर झाले सामाजिकदृष्ट्याही मोठे बदल झाले. या कार्यालयात काही स्थानिक मुलीही काम करत आहेत. कुटुंबीय त्यांना नोकरीसाठी शहरात पाठवू इच्छित नव्हते. मात्र आम्ही गावातच राहून त्यांना काम करण्याची आॅफर दिली असता ते लगेच तयार झाले. आज गावातील अनेक मुले- मुली आमच्याकडे आनंदाने काम करत आहेत.
दंडपाणी सांगतात की, कंपनीने जोहो विद्यापीठ सुरू केले आहे. येथे लोकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. कोणतेच शुल्क घेतले जात नाही. यात ९० टक्के विद्यार्थी तामिळनाडूतीलच आहेत. ८७५ विद्यार्थी येथून पदवी घेऊन जोहो कंपनीतच नोकरी करत आहेत. स्वत: दंडपाणी यांच्या मुलानेही येथेच शिक्षण घेत नोकरी मिळवली आहे.
२०१९ मध्ये कंपनीचा महसूल ३४१० कोटी रु. होता. यात ५१६ कोटी निव्वळ नफा होता. कंपनी १९९६ मध्ये अॅडव्हेंट नावाने सुरू झाली होती. २००९ मध्ये जोहो नाव देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.