आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगण काँग्रेसमधील कलह विकोपाला गेला आहे. पक्षाच्या आमदार अनुसयासह प्रदेश काँग्रेस कमिटीतील १३ सदस्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या वक्तव्यावर नाराजी दाखवत राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिम्हा यांच्या वक्तव्यावर त्यांची नाराजी होती. दामोदर म्हणाले होते की, दुसऱ्या पक्षांतून काँग्रेसमध्ये आलेल्या “स्थलांतरितांना’ महत्त्व दिल्याने जुन्या नेत्यांना काय संदेश जात आहे. ते असे बोलत असताना त्यांच्यासोबत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते एम.बी. विक्रमर्का, खासदार एन. उत्तमकुमार रेड्डी आणि आमदार जयप्रकाश रेड्डीही उपस्थित होते. या वक्तव्याकडे संबंधित नेत्यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्ष,खासदार रेवांत रेड्डी यांच्याविषयी नाराजीच्या रूपात पाहिले जात आहे. यावर माजी आमदार ई.अनिल यांनी स्थलांतरित शब्दाला आक्षेप घेतला आहे.
मेघालय : माजी मंत्र्यासह दोघांनी काँग्रेस सोडली
मेघालयात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसला झटका बसला आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डॉ. अम्पारीन लिंगडोह यांनी पक्ष सोडला आहे. लिंगडोह आणखी एका आमदारासह सत्तारूढ एनपीपीत सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. एनपीपी भाजपचा सहकारी पक्ष आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.