आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In The Country Where The Second Wave Of Corona Occurred, There Are 2 3 Times More Patients Than The Previous High

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:देशात जेथे कोरोनाची दुसरी लाट आली तेथे आधीच्या उच्चांकापेक्षाही 2-3 पट अधिक रुग्ण आढळत आहेत

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात ऑक्टोबरनंतर जगात सर्वाधिक रुग्ण सापडले, सप्टेंबरच्या पीकपेक्षा जास्त नवे रुग्ण

भारतात ६ महिन्यांनी २८ मार्च ला जगात सर्वाधिक ६८,०२० नवे कोरोना रुग्ण आढळले.यापूर्वी १८ ऑक्टोबर २०२० ला सर्वाधिक रुग्ण सापडले होते. देशातील १५ पेक्षा जास्त जिल्ह्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप घेतले आहे. या जिल्ह्यांत नव्या रुग्णांचा वृद्धिदर कायम आहे, मात्र अद्याप पीक आलेला नाही. पीक कधी येईल, याबाबत वैज्ञानिकही स्पष्टपणे काही सांगण्याच्या स्थितीत नाहीत. कारण हा दुसऱ्या लाटेचा प्राथमिक टप्पा असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत नव्या रुग्णांचा आलेख सप्टेंबर २०२० मधील पीकपेक्षा २-३ पट जास्त वाढला आहे. वैज्ञानिकांनुसार, सर्व राज्यांनी महाराष्ट्रातील स्थितीपासून धडा घेतला पाहिजे. चाचण्या कमी होत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आदी जिल्ह्यांत दर १०० चाचण्यांमागे २० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.

भास्कर एक्स्पर्ट : डिहायड्रेशन व अतिसार झाल्यावरही चाचणी करणे गरजेचे
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ताप, सर्दी, खोकला ही सामान्य लक्षणे होती. तेव्हा या आजाराबद्दल फार माहिती नव्हती. आता शरीरातील पाणी कमी होणे, अतिसार, वांत्या, सांधेदुखी, हृदय कमकुवत होणे, फुप्फुसांची क्षमता घटण्यासारखी अनेक लक्षणे समोर आली आहेत. यामुळे कुणाला वांत्या, अतिसार होत असला तर त्यानेही कोरोनाची चाचणी करून घेतली पाहिजे.' - डॉ नरेंद्र अरोरा, चेअरमन, काेविड नॅशनल रिसर्च टास्क फोर्स, भारत सरकार

बातम्या आणखी आहेत...