आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मद्रास वेस्ट एक्स्चेंज देशातील असे पहिले व्यासपीठ आहे, ज्याने कचरा आणि भंगाराचा व्यवसाय सुरू केला आहे. ६ महिन्यांपूर्वी उभारलेल्या मद्रास वेस्ट एक्स्चेंजने (एमडब्ल्यूई) आतापर्यंत ७०० टन कचऱ्याचा व्यवसाय केला आहे. अशातच चेन्नई मनपाने या एक्स्चेंजमधून शहरी कचरा विकून ३ लाख रुपये कमावले आहेत. याच मॉडेलवर इंडिया वेस्ट एक्स्चेंज सुरू करण्याची तयारी आहे.
केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी अभियानाचे संचालक कुणालकुमार यांनी सांगितले की, याच मॉडेलला विकसित करून वेस्ट एक्स्चेंजचे राज्य तसेच राष्ट्रीय विभाग सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे.
या एक्स्चेंजची रचना स्मार्ट सिटी मिशनच्या आधारे अगजू पंडिया राजा व त्यांचे सहकारी जिस्मी वर्गीस तसेच पिंकी तनेजा यांनी तयार केली आहे. अजगू सांगतात, कचरा किंवा भंगार खरेदीसाठी वेबसाइट व अॅप तयार केले आहे. यात कुणीही व्यक्ती किंवा संस्था, शाळा, रुग्णालये, मंदिर तसेच कंपन्या मोफत नोंदणी करू शकतात. चेन्नईत आतापर्यंत ११०० हून अधिक ग्राहक तसेच ९०० विक्रेते यात जोडले गेले आहेत. अगजूू म्हणाले, या एक्स्चेंजकडे आता विदेशातूनही विशिष्ट अशा कचऱ्याची मागणी वाढत आहे. रिसायकलिंगचा व्यवसाय करणाऱ्या सुसाई केनेडी म्हणतात, मद्रास वेस्ट एक्स्चेंजमुळे आमचे काम खूप सोपे झाले आहे. एका क्लिकवर आम्हाला कुठे, किती किमतीत कचरा मिळू शकेल हे सहज समजते.
परदेशातूनही होत आहे मागणी
अगजू सांगतात, मलेशियाच्या एका कंपनीने नारळाच्या १०० टन काथ्यांची मागणी केली आहे. ओडिशातूनही ७० टन प्लास्टिकच्या कचऱ्याची ऑर्डर मिळाली आहे. याच पद्धतीने उदबत्ती तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी फुलांचा कचरा मागितला आहे. यासाठी आम्ही मंदिरांशी चर्चा करत आहोत. या मंदिरांनी नोंदणी केली तर तेथील कचरा विकून पैसा कमावता येऊ शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.