आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In The Last 24 Hours 11090 Corona Patients Increased, 3.54 Lakh Cases So Far In The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देश:देशातील संक्रमितांचा आकडा 3.58 लाखांवर; दिल्लीचे आरोग्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील मृतांचा आकडा 11 हजार 921 झाला आहे, मंगळवारी मृतांचा आकडा 2004 वाढला
  • महाराष्ट्रात 2701, दिल्लीत 1859, तामिळनाडूमध्ये 1515 आणि गुजरातमध्ये 524 रुग्ण आढळले

देशातील कोरोना संक्रमितांचा आखडा 3 लाख 58 हजार 779 झाला आहे. दरम्यान, बुधवारी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच, राजधानी दिल्लीत कोरोना चाचणीची फी 2400 रुपये ठरवली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी फी कमी करण्याचे निर्देश दिले होते.आज तमिळनाडुत 2174 नवीन रुग्ण सापडले. यासोबतच राज्यातील संक्रमितांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे. 

सुप्रीम कोर्टाने बुधवारी केंद्राला म्हटले की, त्यांनी राज्यांना कोरोना रुग्णांवर उपचार करत असणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेदन देण्याचे निर्देश जारी करावेत. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, डॉक्टरांनी चार आठवड्यांच्या आत पगार देण्याबाबत केंद्र सरकारने अहवाल द्यावा. तसे न केल्यास गंभीरतेने घेतले जाईल असा इशारा त्यांनी दिला. न्यायालयाने असेही म्हटले आहे की डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचारी क्वारंटाइन केंद्रावरील रूग्णांवर उपचार करणे नाकारू शकत नाहीत.

मंगळवारी सलग सातव्या दिवशी देशात 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये वाढ झाली. देशात मंगळवारी मृतांचा आकडाही 11 हजार 921 वर पोहोचला आहे. तर मंगळवारी 2004 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

तर दिल्लीमध्ये एका दिवसात सर्वात जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर गेल्या काही दिवसा झालेल्या 344 जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे डेथ ऑडिट कमेटीने स्पष्ट केले. यासोबतच दिवसात 437 मृतांचा रिपोर्ट जुळाल्यामुळे आता राजधानीतील मृतांची संख्या ही 1837 वर पोहोचली आहे. 

कोरोना रुग्णांच्या संख्येत देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर गुजरातचा क्रमांक होता. मात्र आता गुजरातला मागे टाकत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र सरकारनेही राज्यात कोरोनामुळे झालेल्या 81 मृतांसोबत मागच्या 1328 मृतांचा समावेश केला आहे. यासोबतच मृत्यू दर वाढून 3.35% झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...