आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • In The Last 24 Hours, 34,861 Patients Were Diagnosed And 38,393 Were Cured, A Decrease Of 4,000 In Active Patients.

देशात कोरोना:मागील 24 तासात 34,861 रुग्ण आढळून आले तर 38,393 बरे झाले, सक्रिय रुग्णांमध्ये 4 हजारांची घट

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा दिलासादायक बातमी समोर आली आहे. दोन दिवसांच्या वाढीनंतर कोरोना केसमध्ये घट झाली आहे. गुरुवारी देशात 34,861 कोरोना रुग्ण आढळून आले तर 38,393 बरे झाले. 481 रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4,018 ने कमी झाली.

दोन दिवसाच्या वाढीनंतर नवीन आणि सक्रिय प्रकरणे पुन्हा कमी झाली आहेत. यापूर्वी मंगळवारी 42,128 नवीन रूग्ण आढळून आले होते आणि 36,876 रुग्ण बरे झाले होते. मंगळवारी सक्रिय प्रकरणांमध्ये 1,237 ची वाढ दिसून आली होती. त्याचप्रमाणे बुधवारी 41,687 रुग्ण आढळून आले होते आणि 38,891 रुग्ण बरे झाले होते. त्यानंतर सक्रिय प्रकरणांमध्ये 2,278 ची वाढ नोंदवण्यात आली.

देशात कोरोना महामारीचे आकडे

 • मागील 24 तासात एकूण रुग्ण : 34,861
 • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 38,393
 • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 481
 • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.12 करोड़
 • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.04
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.19 लाख
 • सध्या उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : 3.99 लाख
बातम्या आणखी आहेत...