आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:देशातील एकूण आकडा 31.50 लाखांच्या पुढे, तर महाराष्ट्रात 6.93 लाख रुग्ण; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 58,323 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 31.50 लाखांच्या पुढे गेला आहे. चांगली बातमी म्हणजे, यातील 23 लाख 84 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, आतापर्यंत 58,323 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 7 लाख 6 हजार 820 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

टेस्टिंगची संख्या कमी झाली

दरम्यान, देशात दररोज होत असलेल्या चाचण्यांची संख्या कमी होत असल्याचे समोर आले आहे. 21 ऑगस्टला 10 लाखांपेक्षा जास्त चाचण्या करुन सरकारने रेकॉर्डब्रेक केला होता. परंतू, यानंतर ही संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. 22 ऑगस्टला 8 लाख चाचण्या झाल्या आणि 23 ऑगस्टला 6 लाख टेस्ट करण्यात आल्या.

महाराष्ट्रात 6.93 लाख रुग्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 6,93,398 झाला आहे. सोमवारी 11,015 रुग्णांची नोंद झाली तर 212 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 1,68,126 अॅक्टीव्ह रुग्ण असून, 5,02,490 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान, 22,465 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह

हरियाणा विधानसभेच्या अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री मनोहर लाल खट्‌टर आणि विधानसभा अध्यक्ष ज्ञान चंद्र गुप्ता कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोघांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आणि संपर्कात आलेल्या लोकांनी आयसोलेट होण्याची अपील केली.

कोरोना संक्रमित आढळण्याचा दर कमी झाल्याचे दिसले. जुलैच्या अखेरपर्यंत प्रत्येक 100 टेस्टमागे 12 पेक्षा जास्त रुग्ण मिळत होते. आता जवळपास 7 रुग्ण आढळत आहे. म्हणजेच संक्रमणाचा दर 6.7% एवढा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोना टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. आता देशात रोज 8 ते 10 लाख लोकांची चाचणी केली जात आहे.