आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The Last 24 Hours, 61455 Cases Have Been Reported, With 20.86 Lakh Cases In The Country So Far, 55,000 In Assam And Over 50,000 In Rajasthan.

देशात कोरोना:देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 21 लाख पार; बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 14 लाखांपेक्षा जास्त, केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी कोरोना पॉझिटिव्ह

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीत मोबाईल टेस्टिंग सेंटरमध्ये एका तरूणाची नमुना घेताना आरोग्य कर्मचारी - Divya Marathi
दिल्लीत मोबाईल टेस्टिंग सेंटरमध्ये एका तरूणाची नमुना घेताना आरोग्य कर्मचारी
  • देशात शुक्रवारी 937 लोकांचा मृत्यू झाला, आतापर्यंत 42 हजार 578 रुग्णांनी या आजारामुळे जीव गमवला आहे

देशातील संक्रमितांची संख्या शनिवारी 21 लाख पार झाली. 24 तासांत देशात 61 हजार 455 लोक पॉझिटिव्ह आढळले. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. या दरम्यान केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांना जोधपुरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशातील बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 14.2 लाख पार झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दरात सुधार होत आहे, तो आता 68.32% झाला आहे. तर मृत्यू दर 2.04% आहे. दुसरीकडे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने सांगितले की, शुक्रवारी 5 लाख 98 हजार 778 कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यासोबत देशात आतापर्यंत 2 कोटी 33 लाख 87 हजार 171 नमुन्यांची चाचणी झाली आहे.

तिकडे कोरोना व्हॅक्सिन बनवण्यावर देशात काम आणि ट्रायल सुरू आहे. कोरोनाच्या औषधावर दोन कंपन्या भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला काम करत आहेत. ह्यूमन ट्रायलला सुरुवात झाली आहे. मोदी सरकारही या व्हॅक्सिनला लोकांनापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. यासाठी केंद्राने दोन पॅनलची स्थापना केली आहे.

बातम्या आणखी आहेत...