आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In The Last 24 Hours, Active Corona Cases Have Increased In 23 Out Of 36 States And Union Territories

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:मागील 24 तासात 36 पैकी 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ॲक्टिव्ह केस वाढल्या, येथे बरे झालेल्यांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना रुग्णांच्या वाढत चालेल्या संख्येने चिंता वाढली आहे. मागील 24 तासात 36 पैकी 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऍक्टिव्ह केस वाढल्या आहेत. याच अर्थ या राज्यांमध्ये नवीन रुग्ण आणि मृत रुग्णांच्या एकूण संख्येपेक्षा बरे झालेले रुग्ण कमी आहेत. महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी 8,623 नवीन केस आढळून आल्या तर 3,648 रुग्ण बरे झाले असून 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

24 तासात 16 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले
शनिवारी देशात 16,803 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. 11,707 रुग्ण बरे झाले तर 112 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1.11 कोटींपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. यापैकी 1.07 कोटींपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून 1.57 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1.61 लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...