आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The Last 24 Hours, The Highest Number Of Patients Was Received In India After US Brazil Corona Virus Updates

कोरोना देश:देशात 4.12 लाख प्रकरणे; जूनच्या अखेरपर्यंत पीएम केअर फंडातून देशात 60 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होतील - जेपी नड्डा

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी पीपीई किट परिधान केलेल्या आरोग्य कर्मचा्याने धारावीतील (मुंबई) रहिवाशांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली. - Divya Marathi
रविवारी पीपीई किट परिधान केलेल्या आरोग्य कर्मचा्याने धारावीतील (मुंबई) रहिवाशांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली.
  • देशात कोरोनामुळे 13 हजार 293 रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक 6053 बळी

देशात कोरोनाचे आतापर्यंत 4 लाख 12 हजार 955 प्रकरणे समोर आली आहेत. पीएम केअर फंडद्वारे देशात जूनच्या शेवटपर्यंत 60 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितले. नड्डा यांनी रविवारी पक्षाच्या व्हर्च्युअल रॅलीत कार्यकर्त्यांना संबोधित केले. 

दुसरीकडे दिल्ली सरकार राजधानीत 30 जूनपर्यंत 1 हजार रुग्णवाहिका तैनात करण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक खासगी रुग्णालयात 60 टक्के बेड राखीव राहावेत असा सरकारचा प्रयत्न आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीत या गोष्टी सामायिक केल्या. या बैठकीला उपराज्यपाल अनिल बैजल देखील उपस्थित होते. याआधी गृहमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक केली होती. 

मागील 24 तासांत इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांतील आणखी 14 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. आयटीबीपीमध्ये एकूण 58 अॅक्टीव्ह रुग्ण झाले आहेत तर 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आयटीबीपी मार्फत ही माहिती देण्यात आली. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत 15413 नवीन रुग्णांची वाढ झाली. या दरम्यान 306 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 10 हजार 461 झाली आहे. यातील 1 लाख 69 हजार 541 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. देशभरातील 2 लाख 27 हजार 756 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 13 हजार 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...