आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पक्षांतर:गेल्या चार वर्षांत 168 खासदार-आमदारांनी केले पक्षांतर, 79% जणांचा भाजपत प्रवेश, यात 47% काँग्रेस पक्षाचे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वीलेखक: धर्मेंद्रसिंह भदौरिया
  • कॉपी लिंक
  • देशातील पक्षांतराच्या राजकारणावर लोकनीती-सीएसडीएसच्या शोधकर्त्यांचा संशोधन अहवाल

दिल्लीत भाजपच्या कार्यालयात २० जानेवारीला तृणमूलचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले, तर पाटण्यात बसपचे एकमेव आमदार जमा खां यांनी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला. नुकतेच भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले की, त्यांच्याकडे भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ४२ आमदारांची यादी आहे. बंगाल, तामिळनाडू निवडणुकीआधी मोठ्या प्रमाणात पक्षांतर होऊ लागले आहे. लोकनीती-सीएसडीएसच्या शोधकर्त्यांच्या संशोधन अहवालात दिसून आले की, २०१७ ते २०२० पर्यंत पदावर असतानाच १६८ आमदार-खासदारांनी पक्षांतर केले. पक्षांतर करणाऱ्या ७९% म्हणजे १३८ जणांनी भाजपची निवड केली. भाजपत प्रवेश करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक ७९ म्हणजे ४७% काँग्रेसचे होते. यात माजी मंत्री, माजी आमदार-खासदार, वरिष्ठ नेत्यांचा समावेश नाही. सीएसडीएसचे प्राध्यापक व राजकीय विश्लेषक संजयकुमार सांगतात की, पक्षांतर नेहमीच होत आले आहे व नेहमीच ज्या पक्षाचे सरकार असते त्याचीच निवड केली जाते. पाच वर्षांतील स्थिती काहीशी वेगळी आहे. सत्तेतील पक्ष मजबूत दिसतो व विरोधक कमकुवत दिसतात. अशा स्थितीत हे पक्षांतर भाजपकडे अधिक होताना दिसते. सलग दोन लोकसभा निवडणूक हरल्याने काँग्रेसमध्ये मजबुतीचे संकेत नाहीत.

कठोर कायदा असूनही सत्र थांबण्याचे नाव घेईना
- १९८५ च्या आधी पक्षांतर रोखण्यासाठी कोणताही कायदा नव्हता. पक्षांतरविरोधी कायदा १ मार्च १९८५ मध्ये आला. ५२ वी घटनादुरुस्ती करत घटनेत १० वी अनुसूची जोडण्यात आली. यामुळे सोयीनुसार पक्षांतर करणाऱ्या आमदार व खासदारांवर लगाम लावण्यात आला.

- २००३ मध्ये या कायद्यातही दुरुस्ती करण्यात आली. यानंतर जर एखाद्या मूळ पक्षात फूट पडली आणि एक तृतीयांश आमदारांनी नवीन गट स्थापन केला तर त्यांचे सदस्यत्व कायम राहील. यानंतर एखाद्या पक्षात फूट पडण्यासाठी एक तृतीयांश सदस्य असणे अनिवार्य करण्यात आले.

पक्षांतराची अशी ही सहा प्रमुख उदाहरणे
- नुकतेच बंगालमध्ये १० आमदार व एक खासदार भाजपत आले.
- अरुणाचल प्रदेशात सातपैकी सहा जदयू आमदार भाजपत आले.
- २०२० मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसचे २६ आमदार भाजपत गेले.
- जुलै २०१९ मध्ये काँग्रेसचे ११ आणि जेडीएसच्या ३ आमदारांनी राजीनामे दिले आणि भाजपत गेले. डिसेंबरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत १५ पैकी १२ जागा भाजपने जिंकल्या.
- २०१९ मध्ये एसडीएफचे १० आमदार रात्रीतूनच पक्ष सोडून भाजपत गेले.
- २०१७ मध्ये मणिपूरमध्ये काँग्रेसचे मंत्री राहिलेले टी. श्यामकुमार यांच्या नेतृत्वात सात आमदार भाजपत गेले.

पक्षांतर केलेल्या माजी आमदार-खासदारांचा समावेश नाही
- राजकारणात उगवत्या सूर्याला अर्थात जिंकणाऱ्यास नमस्कार केला जातो. सर्वोच्च पातळीवरील नेत्यांना पॉवरशी अधिक घेणे असते. मात्र आमदार वा खासदाराची स्थिती वेगळीही असू शकते. - त्रिलोचन शास्त्री, एडीआर

- सत्तेच्या आशेने पक्षांतर वाढले आहे. राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही कमकुवत असते आणि ते पक्षात आपले म्हणणे मांडू शकत नाहीत म्हणून लाेकप्रतिनिधी लांब जातात. - चक्षू रॉय,पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च