आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढील वर्षी हाेऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर २०२४ ची लाेकसभा लक्षात घेऊन भाजपने देशातील निम्म्या राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलण्याची तयारी केली आहे. नवीन प्रदेशाध्यक्षांची घाेषणा याच महिन्यात हाेऊ शकते. अध्यक्ष बदलले जाऊ शकतात अशा राज्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आेडिशा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गाेवा इत्यादींचा समावेश आहे. भाजप मुख्यालयात दाेन दिवस चालणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा हाेणार आहे. बैठक साेमवारपासून सुरू हाेईल. या बैठकीत एकूण ८ सत्रे हाेतील. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सर्वच बैठकांच्या केंद्रस्थानी दाेन वर्षांत हाेणाऱ्या निवडणुका असतील. पक्षाचे उपाध्यक्ष व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह म्हणाले, साेमवारी बैठकीत बूथला आणखी बळकट करण्यावर चर्चा झाली. त्याचबराेबर बूथवरील नियुक्त कार्यकर्त्यांना जास्त सक्रिय करण्याचे पक्षाने ठरवले आहे. जानेवारीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ पूर्ण हाेईल. त्यांना पुन्हा अध्यक्ष करण्यासाठी ५० टक्के राज्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण हाेणे पक्षाच्या संविधानासाठी गरजेचे आहे. म्हणूनच या महिन्याच्या अखेरीस राज्यांत बदल पाहायला मिळू शकतात.
माेदींचा संदेश : कार्यकर्त्यांनी सीमावर्ती गावांपर्यंत पाेहाेचावे साेमवारी बैठकीत पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले, कार्यकर्त्यांनी सीमावर्ती गावापर्यंत गेले पाहिजे. त्याशिवाय वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजेत. देशातील सीमेवरील ५०० गावांपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान, क्रीडा स्पर्धा, संमेलने, चर्चासत्रे, अन्न महाेत्सव इत्यादी कार्यक्रम आयाेजित करावेत. त्याशिवाय स्नेहमिलन कार्यक्रम घेण्याचा सल्लाही माेदींनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.