आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मशिदीत जय श्रीराम:मथुरेतील मशिदीत 4 हिंदू तरुणांनी जय श्रीरामाच्या घोषणेसह केले हनुमान चालीसेचे पठण

मथुराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरेतील नंदबाबा मंदिरात 29 ऑक्टोबरला 2 मुस्लिम तरुणांकडून नमाज पठण केल्याचा प्रकार घडला होता. आता याला विरोध म्हणून बरसाना रोडच्या मशिदीत 4 हिंदू तरुणांनी हनुमान चालीसेचे पठण केले आणि जय श्रीरामाच्या घोषणाही दिल्या. प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी चारही तरुणांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख नावाच्या तरुणाने आव्हान दिले होते की, जर मुस्लिम मंदिरात जाऊन नमाज अदा करू शकतात, तर हिंदू मशिदीत जाऊन हनुमान चालीसेचे पठण करू शकत नाहीत का. यालाच प्रत्युत्तर म्हणून या चार तरुणांनी मशिदीत हनुमान चालीसेचे पठण केले.

पोलिसांनी चौघांना अटक केले

SSP गौरव ग्रोवर यांनी सांगितले की, स्वतःला हिंदूत्ववादी संघटनेचे सदस्य सांगणारे सौरभ शर्मा, राघव मित्तल, कान्हा ठाकुर आणि कृष्णा ठाकुर मंगळवारी बरसाना रोडवरील मशिदीत गेले आणि हनुमान चालीसेचे पठण केले. यानंतर जय श्री राम अशा घोषणा देत मशिदीतून बाहेर आले. पोलिसांनी चौघांना त्यांच्या घरातून अटक केले.

नंदबाबा मंदिरात मुस्लिम तरुणांकडून नमाज पठण
नंदबाबा मंदिरात मुस्लिम तरुणांकडून नमाज पठण

मथुरेतील नंदबाबा मंदिरात 2 मुस्लिम तरुणांकडून नमाज पठण

मथुरेतील नंदगावादील प्रसिद्ध नंदबाबा मंदिरात दोन मुस्लिम तरुणांकडून नमाज पठण केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मंदिर प्रशासनाकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नमाज पठणानंतर मंदिर प्रशासनाने मंदिराची गंगाजलने शुद्ध करुन घेतली.

घटना 29 ऑक्टोबरची असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे मंदिरात गर्दी कमी होती. प्रथामिक चौकशीत समोर आले आहे की, मंदिरात नमाज पठण करणारे दिल्लीच्या खुदाई खिदमतगार संस्थेचे लोक आहेत. यादरम्यान मंत्री श्रीकांत शर्मा म्हणाले की, यातील दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल.