आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The Name Of Getting Settled Abroad, 3600 Brides Looted 150 Crores, NRIs In Punjab

भास्कर पडताळणी:परदेशात स्थायिक करण्याच्या नावाने 3,600 वधूंकडून 150 काेटींची लूट

चंदीगड /जालंधरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये काँट्रॅक्ट मॅरेज करून परदेशात जाण्याचा कल धाेकादायक ठरत आहे. सरासरी राेज दाेन मुलांची परदेशात स्थायिक हाेणाऱ्या मुलींकडून फसवणूक हाेत आहे. गेल्या पाच वर्षांत ३,६०० पेक्षा जास्त तरुण या फसवणुकीला बळी पडले आहेत. लग्नाच्या नावाने १५० काेटी रुपयेही गमावले आहेत. परदेश व्यवहार मंत्रालयात अशा ३,३०० पेक्षा जास्त तक्रारी आल्या असून त्यात ३००० पंजाबच्या आहेत. गेल्या ६ महिन्यांत अशी २०० प्रकरणे समाेर आली असून मुलाकडच्यांनी मुली व तिच्या पालकांवर फसवणुकीचा आराेप केला आहे. ही सर्व प्रकरणे दाेन ते तीन वर्षे जुनी असून तपासानंतर आता त्याची नाेंद झाली आहे. मुलाला परदेशात स्थायिक करण्यासाठी कुटुंबीयांनी आयईएलटीएस उत्तीर्ण मुलींशी लग्न लावून दिले. व्हिसा, संस्थात्मक शुल्क आणि सिक्युरिटी मनी असे सर्व मिळून ४० लाख रुपयांपर्यंत खर्चही केले. परदेशात गेल्यानंतर या मुली उलटल्या आणि त्यांनी मुलाला बाेलवण्यास नकार दिला. परदेशात जाताच या मुली आपले नाव आणि पत्ताही बदलतात असे दिसून आले आहे.

कंत्राट : मुलाला परदेशात जाणे साेपे हाेते
लस्पाऊस व्हिसा : मुलींच्या मदतीने स्पाऊस व्हिसाद्वारे जाणे साेपे असते. मुलीच्या आयएलटीएसमध्ये मुलाला परदेशात स्थायिक करण्याचा समावेश असताे
पद्धत : गाेंधळलेल्या कुटुंबांवर एजंटांची नजर
एजंट फसवतात : आयएसएलटी उत्तीर्ण मुली माहितीच्या आहे. त्यांच्या व्हिसा, अभ्यासाचा खर्च द्यावा लागेल असे एजंट गावातील कमी शिकलेल्या कुटुबांना सांगतात.

२५ लाख खर्च, कॅनडाला पाेहोचून आणखी १० लाखांची मागणी, धक्क्याने मुलाचा मृत्यू
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या महिलेच्या मनदीपसिंह या एकलुत्या एक मुलाला कॅनडात स्थायिक व्हायचे हाेते. ढड्डा गावात राहणे तीर्थ सिंहची आयएलटीएस उत्तीर्ण मुलगी प्रदीप काैरशी ९ सप्टेंबर २०१९ राेजी कंत्राटी विवाह झाला. २५ लाख खर्च करून लग्न झाले व नंतर प्रदीप काैर कॅनडाला गेली. तेथे पाेहोचताच फाेन बंद केला. प्रदीपने कुटुंबीयांकडून आणखी १० लाख रुपये मागितले. मनदीपला हे कळल्यावर त्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.

राज्यातील नेटवर्क : ३ महिन्यांत कंत्राटी लग्नानंतर फसवणूक झाल्याची लुधियानात ३०, जालंधरमध्ये ७० प्रकरणे नाेंद झाली. पंजाबमध्ये ६ महिन्यांतच ३०० प्रकरणे झाली.

ग्रीन कार्ड: न्युझीलंडमध्ये पंजाबी विद्यार्थिनी जास्त असून त्यांच्याकडे ग्रीन कार्ड आहे.त्यांच्याशी लग्न करण्यासाठी मुलांच्या रांगा लागल्या आहेत. एजंट डिल करताे.

देशात 3,600 तक्राारी, यात पंजाबच्या 3,000
एक्स्पर्ट व्ह्यू / दलजितकौर, वकील, पंजाब - हरियाणा हायकाेर्ट
पंजाबमध्ये काँट्रॅक्ट मॅरेजमध्ये फसवणूक हाेण्याच्या राेज तक्रारी येत आहेत. पाेलिस केवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहेत. वास्तविक ही फक्त फसवणूक नाही. यामध्ये संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक, सामाजिक व मानसिक त्रास सहन करावा लागताे. मुलगी परदेशात गेल्यानंतर मुलीचे कुटुंबीय हे संपूर्ण फसवणुकीचे नाटक करतात. त्यानंतर मुली मुलाला घटस्फाेट देण्याची गाेष्ट करतात. अशामध्ये पाेलिस फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करू शकत नाहीत. कारण आराेपी परदेशात स्थायिक हाेते. तक्रारदार फक्त प्रतीक्षा करत बसताे. त्यासाठी विद्यमान कायद्यात बदल करण्याची गरज आहे. अशा आराेपींसाठी डिपाेर्टचा कायदा झाल्यास कडक कारवाई करणे शक्य हाेईल.

बातम्या आणखी आहेत...