आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The National Herald Case, Rahul Was Summoned Today And Sonia On June 8 For Questioning

सोनिया-राहुल गांधींना ईडीची नोटीस:नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल यांना आज तर सोनियांना 8 जून रोजी चौकशीसाठी बोलावले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड केसमध्ये समन्स पाठवले आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी यांना २ जून म्हणजे आज तर सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. राहुल यांनी बाहेरदेशी असल्याचे सांगून ५ जूननंतरची तारीख मागितली आहे, तर सोनिया ८ जून रोजी चौकशीत सहभागी होतील. २०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया आणि राहुल यांच्याविरोधात तक्रार दिली होती. यात स्वामींनी गांधी कुटुंबीयांवर ५५ कोटी रुपयांच्या अफरातफरीचा आरोप केला होता.

राजकारण तापले; काँग्रेस म्हणाली, सुडाची कारवाई, भाजप म्हणाले- कोणता आरोपी म्हणेल.. मी बेइमान काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले- ईडीच्या या कारवाईमुळे आम्ही घाबरणार नाही, न झुकता हिमतीने लढू. मोदी सरकार सुडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. मनी लाँड्रिंगचा कोणताही पुरावा नाही की कोणत्याही मालमत्तेच्या स्थलांतराचे प्रमाण. नॅशनल हेराल्ड प्रकरणात समभागाचे केवळ रूपांतर किंवा कर्ज दिले गेले.

भोपाळमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले- एखादा आरोपी मी बेइमान असल्याचे सांगताना कोणी बघितले का?राहुल तर ना इंडियन, ना नॅशनल ना काँग्रेसचे राहिले आहेत..

असे आहे संपूर्ण प्रकरण : ईडीच्या मते राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्डचे संचलन करणारी कंपनी यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर असताना आपले शेअर हस्तांतरित केले होते. यात १५४ कोटी रुपयांचा लाभ झाला. पण त्यांनी मिळकत कमी दाखवली होती. या प्रकरणी सुब्रमण्यम स्वामींच्या तक्रारीवरून सन २०१३ मध्ये आयकर विभागाने राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या विरोधात चौकशी सुरू केली होती. आयकर विभागाने त्यांना नोटीस देऊन चौकशीही केली होती. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान मनी लाँड्रिंगचे काही पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले. या आधारावर ईडीने एक नवीन खटला दाखल करून चौकशी सुरू केली. त्याचसंदर्भात ईडीने तपास सुरू करत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले आहे.

बातम्या आणखी आहेत...